शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
3
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
4
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
5
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
6
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
7
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
8
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
9
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
10
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
11
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
20
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुसरी पसंती ठरणार ‘गेमचेंजर’

By admin | Updated: November 6, 2016 04:34 IST

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पुणे स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकार मतदारसंघात ६८८ मतदार असून, सर्व मते वैध ठरल्यास पहिल्या फेरीत उमेदवाराला निवडून

पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पुणे स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकार मतदारसंघात ६८८ मतदार असून, सर्व मते वैध ठरल्यास पहिल्या फेरीत उमेदवाराला निवडून येण्यासाठी किमान ३४५ मते मिळणे आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँगे्रसची मते २७८ असून, केवळ पक्षाच्या मतांवर निवडून येणे अनिल भोसले यांना कठीणच आहे. पसंतिक्रमानुसार मतदान होणार असल्याने दुसऱ्या पसंतीची मतेच निणार्यक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मर्यादित मतदार असल्याने पसंतिक्रमांकानुसार मतदान केले जाते. पुण्याच्या जागेसाठी आता पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात शिल्लक राहिले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँगे्रसचे अनिल भोसले, काँगे्रसचे संजय जगताप, भाजपाचे अशोक येनपुरे, राष्ट्रवादीचे बंडखोर विलास लांडे आणि अपक्ष उमेदवार यशराज पारखी यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या नियमानुसार मतदारांना पसंतिक्रमांकानुसार पाचही उमेदवारांना मतदान करण्याचा अधिकार आहे. यामध्ये मतदारांना आपल्या पसंतीनुसार एक, दोन, तीन या प्रमाणे मतदान पत्रिकेवर हाताने क्रमांक लिहावे लागणार आहे. यामध्ये कोणत्या तरी उमेदवाराला प्रथम क्रमांक देणे बंधनकारक आहे. अन्यथा ते मत अवैध ठरू शकते. तसेच एखाद्या मतदाराने एक किंवा दोन उमेदवरांना एकच पसंतिक्रमांक दिल्यावरही अशी मतदानपत्रिका देखील बाद होऊ शकते. त्यामुळे एकूण वैध मतदानाच्या निम्मे अधिक एक मतदान जेवढी संख्या होईल तेवढी मते मिळणारा उमेदवार पहिल्याच फेरीमध्ये निवडून येऊ शकतो. परंतु सध्या काँगे्रस-राष्ट्रवादी काँगे्रसेची राजकीय खेळी, विलास लांडे यांनी माघार घेतली असली तरी त्यांचा राहिलेला अर्ज यामुळे राष्ट्रवादी काँगे्रसचे अनिल भोसले यांना पहिल्या फेरीत हा कोटा पूर्ण करणे सध्या तरी कठीण दिसते. त्यामुळे दुसरा, तिसऱ्या पसंती क्रमांकाची मते मोजावी लागणार आहेत. यामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये एखाद्या उमेदवाराने कोटा पूर्ण केल्यास सहज निवडून येऊ शकतो. यामुळे विधान परिषदेच्या मतांच्या रजकीय खेळीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.राष्ट्रवादीची कागदावरची ताकद उतरणार का मतदानातराष्ट्रवादी कॉँग्रेसकडे कागदावर जरी २७८ मते असली तरी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराची सुरू झालेली लाट पाहता ही मते प्रत्यक्षात येणार का, हा प्रश्न आहे. याशिवाय भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप राष्ट्रवादीत असताना त्यांचा गट होता. ते नगरसेवक तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीत असले तरी प्रत्यक्षात जगताप म्हणजे भाजपाच्या सोबत आहेत. हीच गोष्ट भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्याबाबतही आहे. लांडगे यांच्यासोबतही राष्ट्रवादीचे काही नगरसेवक असल्याचे बोलले जाते. त्यामुळे राष्ट्रवादीचे कागदावरचे बळ जास्त दिसत असले तरी त्याचे मतांत परिवर्तन करणे अवघड आहे. दिग्गजही उतरणार रिंगणात या निवडणुकीतील उमेदवारांच्या नात्यागोत्यामुळे अनेक दिग्गज निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीसाठी पवारांच्या जिल्ह्यातील प्रतिष्ठेची निवडणूक असल्याने अजित पवार पूर्ण शक्ती लावतील. खासदार संजय काकडे भाजपचे सहयोगी खासदार असले तरी भोसले यांचे निकटचे नातेवाईक आहेत. त्यामुळे भोसले यांना त्यांची मदतही होण्याची शक्यता आहे. संजय जगताप यांचे जवळचे नातेवाईक असलेले माजी मंत्री पतंगराव कदमही या निवडणुकीत लक्ष घालण्याची शक्यता आहे. भाजपाचे उमेदवार अशोक येनपुरे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या मतदारसंघातील त्यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. त्यामुळे बापट यांना येनपुरे यांच्यासाठी प्रयत्न करावे लागतील. घोडेबाजाराला येणार तेजीमहापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांत गटांची फेररचना आणि आरक्षण यामुळे अनेकांना या वेळी लढता येणार नाही. त्यांच्यासाठी ही निवडणूक शेवटचीच ठरणार आहे. त्यातच आर्थिकदृष्ट्या जगताप आणि भोसले तितकेच तुल्यबळ असल्याने घोडेबाजारही होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या उमेदवाराची माघार आणि मनसेचा बाद झालेला उमेदवार यामुळे ही तब्बल १११ मते सध्या ‘अनिर्णीत’ अवस्थेत आहेत. ती कोणाच्या पारड्यात झुकतात, यावर निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे. भाजपाच्या उमेदवारीमागे राजकीय खेळीभारतीय जनता पक्षाकडे या मतदारसंघात ६२ मते आहेत. जळगावमध्ये भाजपाच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसने गुलाब देवकर यांची उमेदवारी मागे घेतली. पुण्याच्या जागेच्या बदल्यात ही तडजोड झाल्याचे बोलले जात होते. मात्र, पुण्यात जिंकून येण्याइतपत संख्याबळ नसतानाही भाजपाने अशोक येनपुरे यांची उमेदवारी कायम ठेवली आहे. यामागे राजकीय खेळी असल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे पूर्ण बहुमत नाही. त्यामुळे विरोधातील उमेदवारांचे मतविभाजन होणे त्यांच्या पथ्यावर पडणार आहे. प्रत्यक्षात युती किंवा आघाडी न करताही राष्ट्रवादीला भाजपा उमेदवाराचा फायदाच होणार आहे. शिवसेनेची भूमिका ठरणार महत्त्वाचीभाजपानेच राष्ट्रवादीला मदतीची भूमिका घेतली असेल तर शिवसेना काय करणार, हा देखील प्रश्न आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर विलास लांडे यांनी खासदार शिवाजीराव आढळराव यांची भेट घेतली होती. मात्र, ऐनवेळी लांडे यांनीच माघार घेतली. शिवसेनेचे माऊली खंडागळे यांचीही माघार झाली. भाजपने काही खेळी करू नये यासाठी उशिरा माघार घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भाजपला मदत करून युतीचा धर्म निभवायचा की दगडापेक्षा वीट मऊ नात्याने कोणातरी उमेदवाराच्या पारड्यात आपली मते टाकायची असा शिवसेनेपुढे प्रश्न आहे. राष्ट्रवादीतील नाराजी शमविण्याचे आव्हानराष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पक्षनेतृत्वापुढे नाराजी शमविण्याचेही आव्हान आहे. भोसले यांना उमेदवारी मिळणार नाही, अशी चर्चा असल्याने अनेकांनी तयारी केली होती. याशिवाय गेल्या सहा वर्षांमध्ये भोसले यांनी मतदारांशी संपर्क ठेवला नाही, असादेखील आरोप होत आहे.