शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

लसीचा दुसरा डोस देण्यासच प्राधान्य राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:19 IST

पुणे : शहरात ६० वर्षांपुढील २ लाख ४२ हजार २८५ जणांना, तर ४५ ते ५९ वयोगटातील १ लाख ८३ ...

पुणे :

शहरात ६० वर्षांपुढील २ लाख ४२ हजार २८५ जणांना, तर ४५ ते ५९ वयोगटातील १ लाख ८३ हजार ७ जणांना अद्याप दुसरा डोस देण्याचे बाकी आहे़ फ्रंटलाईन वर्कर या गटातील ४५ हजार ६७४ जण दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहे. परंतु, १ मेपासून शहरातील १८ ते ४४ वयोगटातील मर्यादित लसीकरण वगळता इतर वयोगटातील सर्वांचे लसीकरण बंद आहे़

परिणामी राज्य शासनाकडून लस प्राप्त होताच, प्रारंभी ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस देण्यास प्राधान्य राहणार आहे़ त्यातही लस देताना पहिला डोस घेतल्यानंतर ज्या व्यक्तींना जास्त दिवस झाले आहेत, अशा व्यक्तींना प्रथम लस दिली जाणार आहे़

-----------------------

सर्व लसीकरण केंद्रांना समान लसपुरवठा

शहरातील सर्व लसीकरण केंद्रांना समान लसपुरवठा करण्याबाबतचे नियोजन महापालिकेने केले आहे़ याकरिता प्रत्येक लसीकरण केंद्रावर गेल्या पाच दिवसांत किती लसीकरण झाले, याची सरासरी काढून त्यांना पुढील दिवसासाठी लस पुरविली जाणार असल्याचे रुबल अग्रवाल यांनी सांगितले आहे़

------------------------------------

लसीच्या दुसऱ्या डोसला विलंब झाला तरी काळजी नको

लसीच्या तुटवड्यामुळे शहरातील सर्वच लसीकरण केंद्र बंद असल्याने, अनेकांना को-व्हॅक्सिजन व कोव्हिशिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठी दिलेली तारीख उलटून गेली आहे़ मात्र लसीच्या दुसऱ्या डोसला विलंब झाला तरी काळजी करण्याचे कारण नाही़ लसीचा पहिला डोस हा देखील शरिरात कोविड-१९ विषाणूच्या विरोधात लढणाऱ्या अ‍ॅण्टिबॉडीज तयार करत आहे़ त्यामुळे दुसरा डोस घेताना थोडासा विलंब झाला तरी काही फरक पडणार नाही, असे महापालिकेचे साथरोग नियंत्रण अधिकारी तथा सहायक आरोग्य अधिकारी डॉ़ संजीव वावरे यांनी सांगितले आहे़