शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

डिंभेतून दुसरे आवर्तन सोडले

By admin | Updated: January 31, 2015 00:25 IST

: डिंभे धरणातून यंदाचे दुसरे आवर्तन सुरू झाले आहे. सध्या धरणाच्या उजव्या कालव्यातून ५६०, तर डाव्या कालव्यातून १९० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे

डिंभे : डिंभे धरणातून यंदाचे दुसरे आवर्तन सुरू झाले आहे. सध्या धरणाच्या उजव्या कालव्यातून ५६०, तर डाव्या कालव्यातून १९० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. यापैकी पॉवर हाऊसमधून ७००, तर आऊटलेटमधून ५० क्युसेक्स पाणी वळविण्यात आले आहे. दररोज डिंभे धरणातून ७५० क्युसेक्सच्या गतीने विसर्ग सुरू आहे. सध्या धरणात ६१ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे.आजतागायत या धरणाची पाणीपातळी ७९०.०५ वर आली असून, धरणात ६१ टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. डाव्या कालव्यामधून सोडले जाणारे पाणी हे येडगाव धरणात सोडण्यात येते. पुढे ते कर्जत, पारनेर या नगर जिल्ह्यातील व करमाळा (जि. सोलापूर) तालुक्यातील गावांपर्यंत पोहोचविले जाते. उजव्या कालव्यातून सोडण्यात येत असलेले पाणी हे घोडशाखा कालव्यामधून आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील घोडेगाव, मंचर, निरगुडसर, लौकी, थोरांदळे मार्गे जांबूत, टाकळी हाजीमार्गे शिरूर तालुक्यातील गावांना सिंचनासाठी दिले जाते.डिंभे धरण १०० टक्के भरले होते. यंदाच्या हंगामात आक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान या धरणातून पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. या वेळी धरणातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली. दुसऱ्या आवर्तनापर्यंत पाणीसाठा ६१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आजतागायात या धरणात ६१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. २४ जानेवारीपासून धरणाच्या डाव्या कालव्यातून ५५० क्युसेक्स पाणी सुरू होते. काल (दि. २९) संध्याकाळी त्यात १० क्युसेक्सने वाढ केली आहे. याच वेळी उजवा कालवाही सुरू करण्यात आला असून, या कालव्यातून १९० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. एकंदरीत, धरणातून सध्या दररोज ७५० क्युसेक्स पाणी बाहेर सोडण्यात येत असल्याची माहीती डिंभे धरण शाखा अभियंत्यांकडून मिळाली आहे. सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा उपयोग नगर व पुणे याजिल्ह्यांतील हजारो हेक्टर शेतीक्षेत्राला सिंचनासाठी होणार आहे. (वार्ताहर)