राज्य शासनातर्फे २०१९ या वर्षात पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांसाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षण न ठेवता त्यात सुधारणा केली जाणार आहे. एसीईबीसी अंतर्गत अर्ज भरलेल्या उमेदवारांना आता खुल्या प्रवर्गातून अर्ज करावा लागणार आहे. एसईबीसी अंतर्गत अर्ज भरलेल्या उमेदवारांना १५ दिवसांचा कालावधी द्यावा. तसेच त्यांच्याकडून खुल्या प्रवर्गासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कासह नव्याने परीक्षेचा अर्ज भरून घ्यावा, असे या अध्यादेशान नमूद केले आहे.
पोलीस महासंचालकांनी तत्काळ यानुसार कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा,असे गृह विभागाने प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशात स्पष्ट केले आहे. मात्र, विविध मराठा संघटनांनी या निर्णयाचा विरोध केला असून एसईबीसी आरक्षण लागू होत नाही; तोपर्यंत कोणतीच भरती प्रक्रिया राहू नये, अशी भूमिका घेतली आहे.