शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मतदान यंत्रे झाली सीलबंद!

By admin | Updated: October 9, 2014 05:35 IST

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात निवडणूक विभागाकडून उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रे सीलबंद करण्याचे काम पूर्ण

राजगुरुनगर : खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात निवडणूक विभागाकडून उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रे सीलबंद करण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी हिंमतराव खराडे आणि तहसीलदार प्रशांत आवटे यांनी दिली. मतदानासाठीची इतरही तयारी झाल्याचे त्यांनी सांगितले. मतदानासाठी ३३१ मुख्य केंद्रे असून, ३३ साहाय्यकारी केंद्रे आहेत. केंद्रांची तपासणी पूर्ण झाली आहे. मतदारसंघात ३३ विभाग करण्यात आले आहेत. एकूण ४३० मतदान यंत्रे मतदानासाठी वापरण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. मतदान साहित्याचे वाटप, मतदानानंतर ते स्वीकारणे आणि मतमोजणीपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे काम तालुका क्रीडा संकुलात होणार आहे. त्यादृष्टीने तेथे कडक सुरक्षाव्यवस्था, सीसीटीव्ही कमेरे आणि कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात सर्व ३३ विभागांत मतदानाच्या दिवशी प्रत्येकी एक तज्ज्ञ डॉक्टर देण्यात येणार असून, प्रत्येक मतदान केंद्रावर प्राथमिक उपचाराचे सर्व साहित्य मतदानाच्या साहित्याबरोबर देण्यात येणार असल्याची माहितीही हिम्मतराव खराडे व प्रशांत आवटे यांनी दिली. प्रत्येक मतदान केंद्रावर अत्यावश्यक औषधे ठेवण्यात आली आहेत. मतदानाच्या वेळी मतदान कर्मचारी व मतदार यांना त्रास झाल्यास त्यांच्यावर तेथेच प्राथमिक उपचार करण्यात येणार आहे. मतमोजणीबाबत माहिती देताना हिम्मतराव खराडे व प्रशांत आवटे यांनी सांगितले की, खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू क्रीडासंकुलात घेण्यात येणार आहे. एकूण २२ टेबल लावण्यात येणार असून दि.१९ रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. जवळपास तीन तासांत निकाल हाती येईल. मतमोजणीसाठी संबंधित पक्षाचा उमेदवार, प्रतिनिधी यांनी सकाळी सात वाजताच येथे हजर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)