शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शाळा भरणार सकाळी

By admin | Updated: March 31, 2017 02:19 IST

१ एप्रिलपासून उन्हाळी वातावरणामुळे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा सकाळी ७:३० ते ११:३० या वेळेत सकाळी

राजेगाव : १ एप्रिलपासून उन्हाळी वातावरणामुळे मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळा सकाळी ७:३० ते ११:३० या वेळेत सकाळी शाळा भरविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हा समाजकल्याण अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांनी नुकतेच एका परिपत्रकानुसार हे आदेश दिले आहेत.विद्यार्थ्यांना शिकविण्याचे तास दररोज चार तासांहून कमी असू नये, असेही परिपत्रकात म्हटले आहे. महाराष्ट्र राज्यात बहुतांश भागात यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच भयंकर उकाडा जाणवत आहे. चाळीसीच्या पुढे उन्हाचा पारा चढलेला आहे. गावोगावी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. गावालाच पाणी पिण्यासाठी नसल्याने काही शाळेत फेब्रुवारी पासूनच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. यंदा उष्णतेचा पारा ४० अंशाच्या वर गेला आहे. त्यामुळे १ मार्च पासून पुणे जिल्हयातील शाळा सकाळी सूरू कराव्यात यासाठी सर्वच संघटनांच्या प्रतिनिधींनी प्रशासनाकडे दरवर्षी प्रमाणे यंदाही पाठपुरावा केला होता. परंतु प्रशासनाने होकार न दिल्याने पुणे जिल्ह्यात १ मार्च पासून सकाळची शाळा सुरू झाली नाही. दरम्यान पुणे जिल्ह्णाच्या सिमेवर असणाऱ्या सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात मात्र १ मार्च पासूनच सकाळी शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. जिल्ह्यात १ मार्चपासून सकाळची शाळा सुरू करण्यासाठी सर्वच संघटनांनी पाठपुरावा केला होता . परंतु सकाळी ७ ते ११ या मर्यादित वेळेत आठवड्याच्या ४५ तासिका भरत नाहीत. शिवाय जिल्हा परिषदेच्या शाळेत येणारी गरीब, मजूर, शेतकरी, कामगारांची मुले दिवसभर शाळेत बसली तर त्यांचे कडक उन्हापासून संरक्षण होऊ शकते. अशी भुमिका िप्रशासनाने घेत १ एप्रिलाच सकाळची शाळा होईल, असे सांगितले होते.