शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या बस सुरू होणार

By admin | Updated: July 1, 2017 08:05 IST

विद्यार्थी वाहतुकीसाठीच्या बसच्या दरात केलेली वाढ मागे घेण्यास पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी अखेर मान्यता दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : विद्यार्थी वाहतुकीसाठीच्या बसच्या दरात केलेली वाढ मागे घेण्यास पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी अखेर मान्यता दिली. हा दर १४१ रुपयांवरून ६६ रुपये करण्यात येणार आहे. या दरामधील तफावत महापालिकेच्या वतीने नेहमीप्रमाणे पीएमपीला देण्यात येणार आहे.शाळांना न कळवता तसेच संचालक मंडळाची मान्यता न घेताच मुंढे यांनी शाळा सुरू होण्याच्या ऐन एक दिवस आधी शाळांसाठीच्या बसच्या दरात प्रतिकिलोमीटर वाढ केली. काही शाळांनी जादा दर स्वीकारून बस सुरू ठेवल्या, मात्र काही शाळांनी बससेवा बंद केली. त्याचा विद्यार्थी संख्येवर परिणाम झाला. या विषयावर चर्चा करण्यासाठी म्हणून महापौर मुक्ता टिळक यांनी बैठकीसाठी मुंढे यांना बोलावले पण ते या बैठकीला आलेच नाहीत, त्यावरून बराच गदारोळ उडाला.शुक्रवारी महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, मुंढे, त्रिंबक धारूरकर आदी या बैठकीला उपस्थित होते. विद्यार्थी वाहतुकीसाठीचा वाढवलेला दर कमी करण्याची तयारी मुंढे यांनी दर्शवली. त्यामुळे शनिवारपासूनच या बस सुरू होतील अशी माहिती भिमाले यांनी दिली. पीएमपी सेवेत सुधारणा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करून महापौर टिळक यांनी मुंढे यांना काही सूचना केल्या. त्यानुसार सुधारणा करण्याचे त्यांनी मान्य केले.