पुणो : महापालिकेने शिक्षण मंडळातील रजा मुदत योजनेंतर्गतच्या 13क् शिक्षकांची सेवा थांबविली होती. त्यामुळे ‘शिक्षकांविना शाळेची घंटा’ असे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्यामुळे शिक्षण मंडळातील सदस्यांनी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्या बरोबर बैठक घेतली. त्यानंतर जगताप यांनी शाळांसाठी तातडीने रजा मुदतीच्या शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष प्रदीप धुमाळ यांनी आज दिली.
शिक्षण मंडळातील विविध शाळातील पहिल्या सत्रनंतर 13क् रजा मुदतीच्या शिक्षकांची सेवा खंडित करण्यात आली होती. त्यामुळे दुस:या सत्रतील शाळेचे अनेक वर्ग बंद होते. मात्र, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्याविषयीचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्यानंतर मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ, उपाध्यक्ष नुरुद्दीन सोमजी यांच्यासह इतर सदस्य आणि मुदत रजेवर काम करणा:या शिक्षकांनी आयुक्त राजेंद्र जगताप यांची भेट आज घेतली.
दरम्यान, जगताप यांच्यासह शिक्षण मंडळाचे पदाधिकारी, शिक्षण प्रमुख बी. के. दहिफळे आदींची बैठक झाली. विद्याथ्र्याचे हित लक्षात घेऊन रजा शिक्षकांना तातडीने सेवेत घेण्याची मागणी प्रदीप धुमाळ यांनी केली. ते म्हणाले, शासनाच्या नियमानुसार 5क् विद्याथ्र्यामागे एक शिक्षक आवश्यक आहे. शिक्षकांच्या रजेच्या काळामध्ये विद्याथ्र्याचे नुकसान होऊ नये म्हणून रजा मुदतीतील शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात नेमले जातात.
शिक्षण हक्क कायद्यानुसार अधिकाधिक विद्याथ्र्यानी शिक्षण घ्यावे, यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात विद्यार्थी पटसंख्या वाढली आहे. गेल्या काही वर्षापासून शिक्षकभरती आणि पदोन्नती न झाल्याने शिक्षक अपुरे पडतात. यासाठी रजा मुदतीतील शिक्षकांना या वर्गावर नेमले जात आहे. केवळ प्रत्येक विद्याथ्र्याला शिक्षण मिळावे हा हेतू आहे. प्रशासनाने शिक्षकभरती आणि पदोन्नतीसाठी वेगाने प्रय} केल्यास कायमस्वरूपी शिक्षकांची नियुक्ती करता येणार आहे. (प्रतिनिधी)
अधिकाराचा तिढा कायम
अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी रजा शिक्षकांना पुन्हा एकदा सेवेत घेण्याचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून शिक्षण मंडळाशी संबंधित विषयांवर निर्णय घेण्याचे अधिकार कोणाला ? हा तिढा कायम आहे. त्यामुळे महापालिका शाळेतील विद्यार्थी अनेक सुविधांपासून वंचित आहेत.