शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नववी ते बारावीच्या शाळा ४ जानेवारीपासून सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:10 IST

पुणे : कोरोनाच्या संसर्गामु‌‌ळे १६ मार्चपासून बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. नव्या वर्षात ४ ...

पुणे : कोरोनाच्या संसर्गामु‌‌ळे १६ मार्चपासून बंद असलेल्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. नव्या वर्षात ४ जानेवारीपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास पुणे महापालिकेने मान्यता दिली आहे़

महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहे़ या आदेशात विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी घेणे व ती शिक्षण पर्यवेक्षक माध्यमिक शिक्षण विभाग यांच्याकडे सादर करणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट केले आहे़

कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव शहरात कमी झाल्याने, जूनपासून ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत टप्प्याटप्प्याने काही क्षेत्रे खुली करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली़ यानुसार पुणे महापालिकेनेही २३ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ दिसू लागल्याने ३ जानेवारीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता.

या शैक्षणिक वर्षातील दहावी व बारावीच्या परीक्षा अवघ्या तीन महिन्यांवर आल्याने महापालिकेने ४ जानेवारीपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश देतानाच कोरोना प्रतिबंधासाठी शाळेमध्ये नित्याने निर्जंतुकीकरण करणे, थर्मामिटर, पल्स ऑक्सिमिटर, हात धुण्यासाठी पुरेशी व्यवस्था करण्यास सांगितले आहे. एका वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी या प्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करावी असे सूचित करण्यात आले आहे़ शाळा उघडण्यापूर्वी या सर्व बाबींची पूर्तता झाल्याची खात्री माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी करुन तसा अहवाल सादर करावा असेही स्पष्ट करण्यात आले आहे़

चौकट

शिक्षक-कर्मचारी दि. २८ पासून शाळेत

शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने पूर्वतयारीसाठी शाळा प्रशासनाने त्यांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २८ डिसेंबरपासून शाळेत उपस्थित राहण्यास सांगितले आहे़ पुणे महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने सोमवारी (दि. २८) महापालिकेच्या शाळा मुख्याध्यापकांची बैठक बोलावली असल्याचे महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी सांगितले.