शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

मोहरी, जांभळी केंद्राच्या शाळा डिजिटल

By admin | Updated: April 11, 2016 00:38 IST

शैक्षणिक लौकिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा वाढत असताना अत्यंत विचारपूर्वक ज्ञानरचनावादाचा स्वीकार केलेला आहे

कापूरव्होळ : शैक्षणिक लौकिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा वाढत असताना अत्यंत विचारपूर्वक ज्ञानरचनावादाचा स्वीकार केलेला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोबाईल डिजिटल मिशनद्वारे परिपूर्ण होत आहेत. हे आधुनिक शिक्षण क्रांतीचे नवे पर्व सुरू होत असल्याचे मत भोर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपट महाजन यांनी केले.केतकावणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ‘मोबाईल डिजिटल मिशन’ या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात जांभळी व मोहरी या केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या मोबाईल डिजिटल मिशनने शंभर टक्के परिपूर्ण करण्यात आल्या. भोर तालुक्यात असा उपक्रम प्रथमच या दोन्ही केंद्रांनी यशस्वी केला. महाजन यांच्या हस्ते केंद्रप्रमुख मा. न. गायकवाड व शिवाजी जाधव यांच्या अथक परिश्रमातून मोबाईल डिजिटल किट पारवडी, कुरूंगवडी, जांभळी, सोनवडी, सांगवी, वीरवाडी, केतकावणे, कोळवडी, मोहरी खुर्द व मोहरी बुद्रुक, हातवे बुद्रुक, हातवे खुर्द, मादगुडेवाडी, भिलारेवाडी, धनगरवस्ती, देऊळवाडी, सुतारवाडी, तांबाड एक व तांबाड दोन या शाळांना देण्यात आले. यानंतर भोर तालुका पंचायत समितीचे उपसभापती रोहिणी बागल यांनी जांभळी व मोहरी केंद्रातील सर्व शाळांच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या.या वेळी शिवाजी जाधव यांनी तयार केलेले गुणवत्ता विकास किट हे ज्ञानाचे आदान-प्रदान करण्याचे पुस्तक उपस्थित मार्गदर्शकांना भेट देण्यात आले.(वार्ताहर)> धांगवडी शाळेत शंभर टक्के पटनोंदणीकापूरव्होळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना शासनस्तरावरून राबवीत असताना गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत, पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शैक्षणिक प्रगत महाराष्ट्र शंभर टक्के पटनोंदणीची गुढी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धांगवडी यांनी उभारून दमदार व आल्हाददायक वातावरणात इयत्ता पहिलीचा प्रवेश उत्सव साजरा झाल्याची माहिती मुख्याध्यापिका शोभा कामठे यांनी दिली.हा उपक्रम आठ ते पंधरा एप्रिलपर्यंत जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळांमधून सुरू राहणार असल्याची माहिती आळंदीचे केंद्रप्रमुख सु. ना.आवाळे यांनी दिली. या वेळी धांगवडीच्या सरपंच संगीता तनपुरे, उपसरपंच मा. म. तनपुरे, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष गोकुळ बारणे, राजेंद्र गाढवे, दीपिका केदारी, पंचशीला कांबळे, स्वाती देशमाने आदी उपस्थित होते.(वार्ताहर)