शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सोने गहाण ठेवून भरली शाळेची फी

By admin | Updated: April 9, 2017 04:46 IST

शुल्क भरले नाही म्हणून शाळेने विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यापासून रोखून धरले. मात्र, शुल्काची रक्कम तातडीने भरणे शक्य नसल्याने संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना सोने गहाण

पुणे : शुल्क भरले नाही म्हणून शाळेने विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यापासून रोखून धरले. मात्र, शुल्काची रक्कम तातडीने भरणे शक्य नसल्याने संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना सोने गहाण ठेवून शुल्क भरावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे. शिक्षण हक्क कायद्याची (आरटीई) पायमल्ली करून शाळांकडून सातत्याने पालकांची विविध प्रकारे अडवणूक केली जात आहे.विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारे त्यांच्या शैक्षणिक हक्कांपासून वंचित ठेवणे ही बाब आरटीई कायद्याचे उल्लंघन आहे. या कलमान्वये शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांची कोणत्याही कारणास्तव शैक्षणिक हक्कांसाठी अडवणूक करता येत नाही. मात्र, काही शाळांकडून कायद्यातील या तरतुदीला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. शैक्षणिक शुल्कात अवाजवी वाढ करण्याबरोबरच शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवणे, त्यांना परीक्षेला बसू न देण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडू लागले आहेत. या मुजोरीला काही पालकही बळी पडत असून, पाल्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी कशाही पद्धतीने पैसे जमा करून शुल्क भरत आहेत. अनेक पालक शाळांकडून मुलांना त्रास दिला जाईल, या भीतीने तक्रार करण्यासाठी पुढे येत नाहीत. तर काही पालक याविरोधात आवाज उठवत असून, त्याला यशही मिळत आहे. ताथवडे येथील शाळेनेही अशाच प्रकारे काही विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानंतर विद्यार्थ्यांना निकाल देण्यात आला. हडपसर परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेची सध्या परीक्षा सुरू आहे. ज्या विद्यार्थ्यांचे शुल्क बाकी आहे, त्या विद्यार्थ्यांना परीक्षेलाच बसू न देण्याचा निर्णय या शाळेने घेतला आहे. एका पालकाने दिलेल्या माहितीनुसार,शाळेने शुल्क न भरलेल्या १४ ते १५ विद्यार्थ्यांना परीक्षेला न बसू देता एका खोलीत एकत्र केले. शुल्क भरल्याशिवाय परीक्षेला बसू न देणार नाही, असे सांगितले. मी याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार करणार होतो. मात्र, पाल्यांचे नुकसान होईल, या भीतीने तक्रार केली नाही. हडपसर येथील शाळेत एका पालकाच्या दोन मुली इयत्ता पहिली व पाचवीमध्ये शिकत आहेत. या दोघींचे मिळून सुमारे २७ हजार शुल्क भरण्यात आले नव्हते. परीक्षा सुरू झाल्यानंतर शाळेने त्यांना परीक्षेला बसू दिले नाही. या मुलींच्या पालकांनी ‘लोकमत’शी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. ‘शुल्क भरल्याशिवाय दोन्ही मुलींना परीक्षेला बसू दिले जाणार नव्हते. मी वाहतूक व्यवसायात आहे. त्यामुळे एवढे पैसे लगेच जमविणे शक्य नव्हते. पण मुलींचे नुकसान होऊ नये म्हणून सोने गहाण ठेवून शुल्क भरले. मुलांना परीक्षेला बसू दिले,’ असे संबंधित पालकाने सांगितले.आरटीई कायद्यानुसार विद्यार्थ्यांना शैक्षणिक हक्कापासून वंचित ठेवता येत नाही. मात्र, अनेक पालक भीतीपोटी संबंधित शाळांची तक्रार करीत नाहीत. बेकायदेशीर शुल्क वसूल करणे, शुल्क न भरल्याने परीक्षेला बसू न देणे किंवा निकाल राखून ठेवणे, हे प्रकार चुकीचे आहेत. अन्याय झालेल्या पालकांनी याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदन द्यावे. त्यानुसार संबंधित शाळांची चौकशी करून कारवाई केली जाईल. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही शाळेची गय केली जाणार नाही.- गोविंद नांदेडे, शिक्षण संचालक (प्राथमिक)