मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील केळद येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक उपस्थित नसल्याने एका दिवसापासून शाळा बंद असल्याने संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावले. पंचायत समिती शिक्षण विभागाकडे याबाबत तक्रारीचे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. या निवेदनात असे म्हटले आहे, की दि. १८ व १९ जानेवारीला केळद येथील जिल्हा परिषद शाळा शिक्षक नसल्याने बंद होती. या शाळेतील शिक्षक कधीही वेळेवर शाळेत येत नाहीत. त्याचा परिणाम अध्यापनावर होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे येथील शिक्षकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.याबाबत वेल्हे शिक्षण विभागातील प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुनील मुगळे म्हणाले, की यासंबंधीचे निवेदन ग्रामस्थांनी दिले असून, येथील शिक्षकांचे विनावेतन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.वेल्हे तालुक्यातील १८ गाव मावळ हा परिसर तोरणा किल्ल्याच्या मागील बाजूला असून तालुक्याचा पश्चिम भाग म्हणून अतिमागास अशी ओळख आहे. या भागाला निसर्गाने जरी भरभरून दिले असले, तरी विकासापासून वंचित भाग आहे. या भागात जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा असून त्यांपैकी बहुतांश शाळांमध्ये वरीलप्रमाणे परिस्थिती आहे.(वार्ताहर)
शिक्षकाअभावी शाळा बंद
By admin | Updated: January 25, 2017 01:35 IST