पुणो : महापालिकेच्या दुस:या सत्रतील शाळा सुरू झाल्या. मात्र, प्रशासनाच्या बेपर्वाई कारभाराचा थेट फटका शिक्षण मंडळातील विशेष मुलांना बसला आहे. गेल्या आठवडय़ापासून शिक्षक नसल्याने शाळा बंद असून, शहराच्या विविध भागांतून विशेष मुलांना घेऊन येणा:या पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शिक्षण मंडळाने मोठा गाजावाजा करीत, ऑगस्ट 2क्क्9 मध्ये समाजातील विशेष मुलांसाठी शिवाजीनगर गावठाणात शाळा सुरू केली. सुरुवातीला 3 शिक्षक आणि 34 विद्यार्थी होते. परंतु, शिक्षण मंडळाच्या प्रशासनाने शिक्षकांची सेवा वारंवार खंडित केली. त्यामुळे सध्या दोन शिक्षिका कार्यरत आहे. परंतु, दिवाळीनंतरच्या दुस:या सत्रच्या शाळा सुरू झाल्या, तरी संबंधित सेवकांना करार वाढवून दिलेला नाही. त्यामुळे शिक्षिका शाळेत येत नाही. शिक्षकच शाळेत नसल्याने शहराच्या विविध भागातून येणा:या पालकांना निराश होऊन परत जावे लागत आहे. त्याविषयीच्या तक्रारी पालकांनी शिक्षण मंडळा केल्या. परंतु, या तक्रारींची कोणतीही दखल घेतली जात नसल्याची व्यथा पालकांनी मांडली.
शिक्षण मंडळातील निर्णयाचे अधिकारी महापालिका प्रशासनाकडे देण्यात आले आहेत. परंतु, महापालिका प्रशासन तातडीने निर्णय घेत नसल्याने शिक्षण मंडळाचे अनेक विषय प्रलंबित आहेत. त्याचा थेट परिणाम विद्याथ्र्याच्या गुणवत्तेवर होत आहे. विशेष मुलांची शाळा पाच वर्षापासून व्यवस्थित सुरू आहे. परंतु, महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे शाळेच्या शिक्षकांना मुदतवाढ मिळाली नाही. त्यामुळे शिक्षकांविना 13क् वर्ग बंद आहेत. त्यामुळे मंडळाचे अनेक उपक्रम बंद पडण्याची भीती सदस्य रघुनाथ गौडा यांनी व्यक्त केली. शाळेला शिक्षक देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. याबाबत आयुक्तांनी तातडीने निर्णय घेण्याची मागणी
होत आहे. (प्रतिनिधी)
विशेष मुलांच्या शाळेसारखा शिक्षण मंडळाचा कोणताही उपक्रम बंद पडणार नाही. प्रशासनाला योग्य सूचना देऊन शाळेला शिक्षक देण्याची व्यवस्था तातडीने करण्यात येईल.
- कुणाल कुमार, आयुक्त.