शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

स्कूलबस चालकांकडून घ्यावा चारित्र्याचा दाखला

By admin | Updated: November 19, 2014 04:20 IST

शहरातील नामांकित शाळांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत असल्यामुळे जिल्ह्याधिकाऱ्यांकडून चारित्र्याचा दाखला

पुणे : शहरातील नामांकित शाळांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत असल्यामुळे जिल्ह्याधिकाऱ्यांकडून चारित्र्याचा दाखला प्राप्त करून घेतलेल्या स्कूलबस चालकांनाच विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यास परवानगी द्यावी, अशी शिफारस राज्याच्या शिक्षण विभागाकडे केली जाणार आहे, असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र गोधने यांनी सांगितले. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतात ही शरमेची गोष्ट आहे, असे नमूद करून गोधने म्हणाले, की जिल्हाधिकाऱ्यांकडून चारित्र्याचा दाखला दिलेल्या व्यक्तीलाच टोल वसूल करण्याच्या कामास ठेवावे, असा निर्णय शासनाने घेतला होता. टोलवसुलीसारख्या कामासाठी संबंधित व्यक्तीच्या चारित्र्याची तपासणी केली जात असेल, तर विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीच्या चारित्र्याचीसुद्धा तपासणी होणे अत्यंत आवश्यक आहे. एखादे घर भाडेतत्त्वावर घ्यायचे असेल, तरीसुद्धा संबंधित व्यक्तीला पोलिसांकडून ना हरकत प्रमाणपत्र द्यावे लागते. त्यामुळे स्कूलबस चालकांची सर्व माहिती तपासून घ्यायला हवी.शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या प्रत्येक स्कूलबसमध्ये महिला सहायक असणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट करून गोधने म्हणाले, की एखाद्या स्कूलबसमध्ये लेडी अटेंडंट नसेल तर पालकांनी संबंधित शाळेकडे याबाबत पाठपुरावा करायला हवा. काही विद्यार्थी शाळेच्या स्कूलबसमधून येत नसतील तर ती कोणत्या वाहनामधून येतात, याबाबतची माहितीसुद्धा शाळेने सामाजिक जाणिवेतून घ्यायला हवी. शाळेला कोणत्याही विद्यार्थ्याची जबाबदारी झटकता येणार नाही.(प्रतिनिधी)