पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पाचवी, आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली असून, येत्या १५ ते २० दिवसात परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल, असे परीक्षा परीषदेचे अध्यक्ष दत्तापत्र जगताप यांनी सांगितले.राज्यातील तब्बल ९ लाख ७१ हजार ७६४ विद्यार्थी यंदा शिष्यवृत्ती परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यात आठवीतील ३ लाख ९७ हजार ३९२ हजार तर पाचवीतील ५ लाख ७४ हजार ३७२ विद्यार्थ्यांचा समावेश होता. गेल्या काही दिवसांपासून प्रश्नपत्रिका, उत्तरसूची याबाबतच्या आक्षेपांची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले. परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप, आयुक्त तुकाराम सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेऊन अंतिम उत्तर सूचीबाबतच्या कामकाज ठरविण्यात आले. उत्तरसूची संदर्भातील आक्षेपांची तपासणी करण्यासाठी विषयतज्ज्ञांची झूम द्वारे सात-आठ वेळा बैठक घेण्यात आली. त्यात अंतिम उत्तरसूचीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकालाची प्रक्रिया राबविण्यात येणार असून येत्या १५ ते २० दिवसात शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर करण्याचा परीक्षा परिषदेचा प्रयत्न आहे.
शिष्यवृत्तीचा निकाल १५ ते २० दिवसांत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 01:59 IST