शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थी सोडून भलत्यालाच शिष्यवृत्ती

By admin | Updated: May 7, 2017 03:00 IST

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दहावी, बारावी शालांत परीक्षेतील कामगार कुटुंबातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना देण्यात

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दहावी, बारावी शालांत परीक्षेतील कामगार कुटुंबातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती लाभार्थीला सोडून भलत्याच व्यक्तीला अदा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चूक झाल्याचे उघड झाल्यानंतर ही रक्कम संबंधित व्यक्तीकडून वसूलदेखील करण्यात आली. २०१४-१५ या वर्षामधील दहावी, बारावी शालांत परीक्षेत गुणवत्ताप्राप्त कामगार व कामगार कुटुंबीय विद्यार्थ्यांचा सत्कार या योजनेंतर्गत गुणवत्ता प्राप्त लाभार्थीला शिष्यवृत्ती प्रदान करीत असताना अभिषेक देशमुख यांना गुणवत्ताधारक म्हणून शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला. मात्र, नंतर नजरचुकीने ही रक्कम अदा करण्यात आल्याची सबब मंडळाकडून देण्यात आली. तसेच आपल्याकडून चूक झाल्याचे लक्षात येताच देशमुख यांना अदा केलेली शिष्यवृत्तीची रक्कम पुन्हा त्यांच्याकडून वसूलही करण्यात आली. दरम्यान, पात्र लाभार्थी सोडून इतर व्यक्तीला रक्कम अदा करण्यासारखा गंभीर प्रकार घडला असतानाही केवळ नजरचुकीने हा प्रकार घडला असल्याची सबब मंडळाकडून पुढे केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच सन २०१२-१३ या आर्थिक वर्षापासून पात्र शिष्यवृत्ती धारकास मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीची रक्कम धनादेशाद्वारे न देता ईसीएसद्वारे देण्यात यावी, असा निर्णय मंडळाने घेतला आहे. तरीदेखील ईसीएसद्वारे शिष्यवृत्ती प्रदान करताना अडचणी निर्माण झाल्याचे कारण देत धनादेशाद्वारेच शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्यात आली. सावळ्या गोंधळाची सारवासारवविद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी योजना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मुंबई कामगार कल्याण कायदा अधिनियमांतर्गत मंडळाला निधी देणाऱ्या कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्याची मंडळाची योजना आहे. कामगारांच्या मुलामुलींना त्या त्या शैक्षणिक वर्षात शिक्षणाकरिता अर्थिक मदत मिळावी हा या योजनेमागील हेतू आहे. ढिसाळ कारभाराचा फटकाकामगार कल्याण मंडळाच्या ढिसाळ कारभाराचा हा नमुना या प्रकरणात पहायला मिळाला. अशाप्रकारे अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या कारभाराचा अनेकांना फटका बसत आहे. चुकीच्या पद्धतीने रक्कम अदाचुकीच्या पद्धतीने रक्कम अदा केली जाते, पुन्हा वसूलही केली जाते. मात्र, असे प्रकार घडतातच कसे, याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.