शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

रेबिजवरील औषधांचा ससूनमध्ये तुटवडा

By admin | Updated: February 8, 2015 23:10 IST

कुत्रा चावल्यानंतर जिवघेण्या रेबीज या आजाराची लागण होऊ नये म्हणून देण्यात येणारी अ‍ॅन्टीरेबीज ही लस ससून रुग्णालयात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली

पुणे : कुत्रा चावल्यानंतर जिवघेण्या रेबीज या आजाराची लागण होऊ नये म्हणून देण्यात येणारी अ‍ॅन्टीरेबीज ही लस ससून रुग्णालयात उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या लसीचा तुटवडा असल्यामुळे कुत्र्यांनी चावा घेतल्यानंतर आलेल्या रुग्णांना औषधे न देताच परत घरी पाठविले जात आहे.पुणे शहरात भटक्या कुत्र्यांची आणि पाळीव कुत्र्यांची संख्या खूप मोठी आहे. पुणे महापालिकेच्या आकडेवारीनुसार दर वर्षाला सुमारे बारा हजार नागरिकांना भटकी कुत्री चावतात. कुत्र्यांच्या चाव्यामुळे रेबीज हा आजार होण्याचा धोका असतो. तो झाल्यास मृत्यू ओढावतो. यामुळे रेबीजला रोखण्यासाठी चावा घेतलेल्या रुग्णांना अ‍ॅन्टीरेबीज लस इंजक्शनव्दारे दिली जाते. ससून रुग्णालयात दिवसाकाठी कुत्र्यांनी चावा घेतलेले सुमारे २० ते २५ मोठे रुग्ण आणि ५ ते १० छोटे बालक येत असतात. या सर्वांना इक्वीरॅब या अ‍ॅन्टीरेबीजचे इंजेक्शन दिले जाते. मात्र आॅगस्ट २०१४ पासून ससून रुग्णालयाला या औषधांचा पुरवठा होत नसल्याने तुटवडा निर्माण झाला आहे. आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१४ या काळात पुरवठा करणाऱ्या २ कंपन्यांकडून अनियमित औषध पुरवठा होत असल्याने एवढा त्रास होत नव्हता. मात्र त्यानंतर औषधेच येणे बंद झाल्याने होती तेवढी औषधे रुग्णालयाकडून वापरण्यात आली आहेत. मात्र गेल्या ३ महिन्यांपासून रुग्णालयात औषधेच उपलब्ध नसल्याने येणाऱ्या रुग्णांना उपचार न करताच घरी पाठवावे लागत आहे. (वार्ताहर)