शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

ऐन रमजानमध्ये फळांची टंचाई

By admin | Updated: June 3, 2017 03:02 IST

रमजान सणामुळे कलिंगड, खरबुज, पपई या फळांना मागणी वाढली असली तरी शेतकरी संपामुळे मोठा तुटवडा जाणवू लागला

पुणे : रमजान सणामुळे कलिंगड, खरबुज, पपई या फळांना मागणी वाढली असली तरी शेतकरी संपामुळे मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. शुक्रवारी गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील फळबाजारात या फळांची आवक जवळपास झालीच नाही. त्यामुळे शिलकी मालाची विक्री दुप्पट भावाने झाली.रमजान सणामध्ये मुस्लिम बांधवांकडून उपवास सोडण्यासाठी कलिंगड, खरबुज, पपई या फळांना पसंती दिली जाते. त्यामुळे या महिन्यात प्रामुख्याने या तीन फळांना बाजारात मोठी मागणी असते. त्यानुसार शेतकऱ्यांकडूनही या काळात ही फळे बाजारात आणली जातात. पण दोन दिवसांपासून सुरू झालेल्या शेतकरी संपामुळे तीनही फळांचा तुटवडा जाणवू लागला आहे. संपाच्या पहिल्या दिवशी गुरुवारी या फळांची काही प्रमाणात बाजारात आवक झाली. मात्र, शुक्रवारी क्वचितच आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. घाऊक बाजारात कलिंगडची सर्वसाधारण आवक सुमारे २० टेम्पो, खरबुज ४ ते ५ टेम्पो तर पपईची १५ ते २० टेम्पो आवक होत असते. मात्र, पपईची एक टेम्पो आवक वगळता इतर दोन्ही फळांची काहीच आवक झाली नाही. गुरुवारी शिल्लक असलेला खराब प्रतिचा मालच शुक्रवारी विक्री करावा लागला. मागणी असल्याने या मालालाही चांगला भाव मिळाला. खरबुजाची विक्री प्रतिकिलो २२ ते २५ रुपये, कलिंगड सुमारे १५ ते २० रुपये तर पपईची ५ ते २२ रुपयाने विक्री झाली, असे फळांचे व्यापारी युवराज काची यांनी सांगितले.रमजानच्या महिन्यामध्ये रोजा सोडताना फळे खाल्ली जातात. फळांचे रस, दूध प्यायले जाते. सकाळी रोजा पकडतानाही दूध प्यायले जाते. मात्र, शेतकरी संपामुळे काही ठिकाणी फळे व दूध मिळायला अडचणी येऊ लागल्या आहेत. ही स्थिती अशीच राहिली तर ऐन रमजानमध्ये अडचणीत वाढ होऊ शकते. रमजान ईदच्या दिवशी तर दुधाशिवाय गत्यंतर नाही.- यासीन पाशा शेख, सचिव, बंधुभाव भाईचारा फाउंडेशन