शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिन्यांच्या कामाच्या निविदांमध्येही घोटाळा

By admin | Updated: May 3, 2017 02:41 IST

टाक्यांच्या निविदा प्रकरणात गडबड झाल्यामुळे थेट राज्य सरकारने स्थगिती दिलेल्या २४ तास पाणी योजनेतील जलवाहिन्यांच्या

पुणे : टाक्यांच्या निविदा प्रकरणात गडबड झाल्यामुळे थेट राज्य सरकारने स्थगिती दिलेल्या २४ तास पाणी योजनेतील जलवाहिन्यांच्या कामाच्या निविदांमध्येही घोटाळा झाला असल्याचा आरोप काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी केला. आयुक्तांच्या मर्जीतील एका कंपनीला व त्याचबरोबर आणखी दोन कंपन्यांना फायदेशीर ठरेल याच पद्धतीने ही १ हजार ७१८ कोटी रुपयांच्या कामाची निविदा करण्यात आली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.ही निविदा ४ मे रोजी खुली होणार आहे. त्यापूर्वीच शिंदे यांनी निविदा दाखल केलेल्या कंपन्यांची नावे जाहीरपणे सांगितली. आयुक्तांच्या मर्जीतील एल अ‍ॅण्ड टी ही कंपनी तसेच विश्वराज व डिग्रामोंट या दोन कंपन्या अशी तीन कंपन्यांना हे काम मिळणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. साखळी करून या तिन्ही कंपन्यांनी महापालिकेने निश्चित केलेल्या दरापेक्षा कितीतरी जास्त दराने त्यांनी निविदा दाखल केलेल्या आहेत व त्यांनाच हे काम मिळणार आहे, असे शिंदे म्हणाले. या निविदेच्या कामात काहीही संबंध नसलेले फायबर आॅप्टिकल केबल टाकण्याचे २२५ कोटी रुपयांचे कामही घुसडण्यात आलेले आहे. त्यासाठी स्थायी समिती किंवा सर्वसाधारण सभा यांची संमती घेतलेली नाही, असाही आरोप त्यांनी केला. काँग्रेसने अगदी सुरुवातीपासून पुणेकरांवर विनाकारण आर्थिक बोजा टाकण्याच्या या प्रकाराचा विरोध केला आहे. त्यामुळे आताही निविदा रद्द करण्यात आली नाही तर पक्षाच्या वतीने आंदोलन केले जाईल, असा इशारा शिंदे यांनी दिला. (प्रतिनिधी)