शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या दिवसाच्या गणरायाला निरोप

By admin | Updated: September 6, 2016 01:00 IST

गणेश प्रतिष्ठापनेबरोबरच महापालिकेने १० दिवसांनंतर येणाऱ्या गणेश विसर्जनाचीही तयारी पूर्ण केली आहे.

पुणे : गणेश प्रतिष्ठापनेबरोबरच महापालिकेने १० दिवसांनंतर येणाऱ्या गणेश विसर्जनाचीही तयारी पूर्ण केली आहे. अर्ध्या दिवसाच्या घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन सोमवारी काही घाटांवर झाले. दीड दिवसाच्या गणपतींच्या विसर्जनासाठी पालिकेने सर्व घाटांवर तयारी पूर्ण केली आहे.गणेशविसर्जनासाठी मुठा नदीच्या शहरातील बहुतेक घाटांवर गर्दी होते. सामान्यत: गणेशविसर्जन १० दिवसांनंतर होत असले, तरी अर्ध्या दिवसाने म्हणजे आजच (सोमवारी सायंकाळी) तसेच दीड दिवसाच्या (मंगळवारी सायंकाळी) गणपतीचे व गौरींबरोबरच काही गणपतींचे विसर्जन होत असले. याचे प्रमाण किरकोळ असले तरीही पालिकेला पहिल्या दिवसापासूनच विसर्जनाची सर्व यंत्रणा सज्ज असल्याची माहिती विसर्जन व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सहआयुक्त सुरेश जगताप यांनी दिली.अर्ध्या दिवसाच्या गणेशविसर्जनाची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी आहे. साधारण १०० गणपती असे अर्ध्या दिवसातच विसर्जित केले जातात. पुण्याच्या मध्य भागात तसेच कात्रज वगैरे परिसरातील काही कुटुंबांमध्ये असे अर्ध्या दिवसाचे गणपती आहेत. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाची संख्याही फार मोठी नाही. त्यातील बहुतेक गणेशमूर्ती परिसरातील विहिरींमध्येच विसर्जित केल्या जातात. फार थोड्या मूर्ती विसर्जनासाठी घाटावर येतात. त्यामुळे त्यांच्यासाठी नदीत पाणी सोडले जात नाही. मात्र, बाकी व्यवस्था करावीच लागते.सात दिवसांनंतरच्या गणेशविसर्जनाची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी घाटांवर सर्व प्रकारची व्यवस्था करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे बहुतेक ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. त्या वेळी आवश्यकता असेल तर नदीत पाणी सोडले जाते. (प्रतिनिधी) ।अर्ध्या दिवसाचे गणपती म्हणजे सकाळी मुहूर्तावर मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाते. नैवेद्य दाखवून विधिवत आरती तसेच अन्य धार्मिक विधी केले जातात. दुपारचे भोजन झाल्यानंतर सायंकाळी मूर्तीचे विसर्जन केले जाते. ही संख्या मोजकीच असल्याची माहिती सुरेश जगताप यांनी दिली.निर्माल्य टाकण्यासाठीचे हौद आहेत. तसेच हौद सर्व घाटांवर ठेवण्यात आले आहेत. मूर्ती विसर्जनही हौदात करावे, असे अपेक्षित आहे. त्यासाठीही हौद उपलब्ध करून देण्यात आले आहे. या हौदांमध्ये या वर्षी अमोनियम बायकार्बोनेट ही पावडर मिसळण्यात आली आहे. त्यामुळे मूर्तींचे त्वरित विसर्जन होते. हे पाणी थेट रोपांना टाकले तरी त्यापासून काहीही हानी होत नाही. मात्र, मूर्ती हौदातच विसर्जित करावी अशी सक्ती नाही, ते ऐच्छिक आहे. गेल्या काही वर्षांत पर्यावरणसंवर्धनाची जाणीव वाढल्यामुळे मूर्ती हौदात विसर्जित करण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती सुरेश जगताप यांनी दिली.