शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सवाई महोत्सव एक जानेवारीला

By admin | Updated: December 21, 2014 00:03 IST

देशविदेशातील रसिकांच्या पसंतीस उतरलेला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आता पुन्हा १ ते ४ जानेवारी २०१५ दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे रंगणार आहे.

पुणे : देशविदेशातील रसिकांच्या पसंतीस उतरलेला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आता पुन्हा १ ते ४ जानेवारी २०१५ दरम्यान न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे रंगणार आहे. अवकाळी पावसाने रसिकांच्या आनंदावर विरजण पाडल्यामुळे महोत्सव स्थगित करण्याची वेळ आर्य संगीत प्रसारक मंडळावर आली होती. त्यामुळे लवकरच हा महोत्सव पुन्हा आयोजित करण्याचे मंडळाने जाहीर केले होते़ त्यानुसार हा महोत्सव घेण्यात येत असून, लवकरच त्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तिकिटासाठी पुणेकरांना रांगा लावण्याची वेळ येते, मात्र रसिकांना पुन्हा या दिव्यातून जावे लागू नये, यासाठी महोत्सवाची तिकिटे ज्या रसिकांनी घेतली होती, तीच तिकिटे आता नव्याने आयोजित करण्यात येणाऱ्या महोत्सवासाठी ग्राह्य धरली जातील, त्यामुळे ही तिकिटे जपून ठेवण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले होते. (प्रतिनिधी)आधीची तिकिटे ग्राह्यच्सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तिकिटासाठी रसिकांना रांग लावावी लागते. रसिकांना पुन्हा ही प्रक्रिया करावी लागू नये, यासाठी ज्या रसिकांनी महोत्सवाची तिकिटे घेतली होती. तीच तिकिटे या महोत्सवासाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. त्यामुळे एक जानेवारीपासून होणाऱ्या महोत्सवासाठी वेगळी तिकिटे काढण्याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात आले.