शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ देशामध्ये तिसऱ्या स्थानावर

By admin | Updated: October 2, 2015 00:47 IST

टाईम्स हायर एज्युकेशनच्या गुणवत्तानिहाय क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पहिल्याच सहभागात भारतीय विद्यापीठात तिसरे स्थान पटकाविले आहे.

पुणे : टाईम्स हायर एज्युकेशनच्या गुणवत्तानिहाय क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पहिल्याच सहभागात भारतीय विद्यापीठात तिसरे स्थान पटकाविले आहे. विशेष म्हणजे, विद्यापीठातील अध्यापन हे बलस्थान ठरले असून, यासाठी विद्यापीठाला देशात दुसरे तर जगात १९१वे मानांकन मिळाले आहे. अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी दिली.यंदा पहिल्यांदाच विद्यापीठाने ‘टाईम्स हायर एज्युकेशन’च्या वतीने निश्चित केल्या जाणाऱ्या विद्यापीठांच्या जागतिक पातळीवरील २०१५-१६या वर्षाच्या गुणवत्तानिहाय क्रमवारीमध्ये सहभाग घेतला होता. टाईम्सने ही क्रमवारी जाहीर केली आहे. जगभरातील शैक्षणिक संस्थांच्या सखोल माहितीचे विश्लेषणावर ही क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. याचबरोबर जगातील ११.३ दशलक्ष शोधनिबंध आणि ११ हजार शैक्षणिक सर्वेक्षणांचाही समावेश होता. या क्रमवारीसाठी विविध शैक्षणिक घटकांचा विचार करण्यात आला. त्यामध्ये अध्यापन, संशोधन, सायटेशन्स, औद्योगिक संस्थांकडून प्राप्त होणारे उत्पन्न, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अध्यापन व संशोधनाबाबतचा दृष्टिकोन याचबरोबर विद्यार्थी, प्रकाशित शोधनिबंध, संशोधनाचा परिणाम आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील दृष्टिकोन या पातळ्यांवर क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)