श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथे श्री पांडुरंग विद्यामंदिरात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना थोरात बोलत होते.
शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार 3 जानेवारी हा दिवस ''''महिला शिक्षण दिन'''' म्हणून साजरा करावा त्यानुसार सावित्रीबाई फुले यांची जयंती ''''महिला शिक्षण दिन'''' म्हणून साजरी करण्यात आली.यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक सुरेश थोरात व स्त्रीशिक्षिका योगीता हरगुडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी महिला शिक्षिका योगीता हरगुडे, सीमा गवारी, पौर्णिमा मारणे, अश्विनी बनसोडे यांचा मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या वेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश थोरात, महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाचे पुणे विभागीय कार्याध्यक्ष प्रवीणकुमार जगताप, सामाजिक कार्यकर्ते रमेश गवारी आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी अक्षरा गवारी, श्रेया ढमढेरे, सानवी लोखंडे, तनिष्का भैरवकर, तनुष्का गवारी, श्रुतिका गवारी, प्रज्वल गवारी, भावेश कातोरे, आयुष गवारी यांनी मनोगत व्यक्त केले, तर अनुजा सांगळे व ईश्वरी गवारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर कविता सादर केली. तर सीमा गवारी यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर माहिती सांगितली.
श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना मुख्याध्यापक सुरेश थोरात, योगीता हरगुडे, विद्यार्थिनी आदी मान्यवर उपस्थित होते.