मंचर : अंगणात खेळणाऱ्या दीड वर्षाच्या चिमुरड्याला विषारी नाग चावला. घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात आणेपर्यंत त्याची श्वसनक्रिया बंद झाली होती. फक्त हृदय सुरू होते. या चिमुरड्याला तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याचे प्राण वाचविले. आमोंडी (ता. आंबेगाव) गावात दीड वर्षाचा पियूष खरात हा सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता घराच्या ओट्यावर खेळत होता. जवळच त्याची बहीण अलिशा खेळत होती, तर आई वसुधा बाहेर स्वयंपाक करीत होती. त्या वेळी पियूष जोरात ओरडला. वसुधा हिने उठून पाहिले असता, बाळाजवळ साप असल्याचे तिने पाहिले. जवळ जावून पाहिले असता पियूषच्या डाव्या पायाला विषारी नागाने चावा घेतल्याचे आढळले. प्रकाश दरेकर यांच्या मोटारसायकलवरून पियूषला तातडीने घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. या दरम्यान विषाचा प्रभाव होऊन त्याची श्वसनक्रिया बंद होऊ लागली होती. या बाळाचा जीव धोक्यात आला होता.रात्री साडेबारा वाजता कृत्रिम श्वासाची नळी काढून तो पूर्ववत श्वास घेऊ लागला. नातेवाइकांनी पियूषला वेळेवर उपचारासाठी आपले. घोडेगाव ग्रामीण रुग्णालयातून १०८ रुग्णवाहिका तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणून योग्य लस उपचार व व्हेन्टीलेटर यामुळे या बाळाचे प्राण वाचल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा देशमुख यांनी दिली. या बाळावर डॉ. सोमेश्वर टाके, संजय भवारी, नेहा कांबळे, संदीप पाटील यांनी उपचार केले. पियूष खरात अजून अतिदक्षता विभागातून असून, त्याची आई सोबत असते. त्यांचा जीवाचा धोका टळला आहे. (वार्ताहर)घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात येईपर्यंत पियूषचा श्वास जवळजवळ थांबला होता. फक्त हृदयाचे ठोके सुरू होते. तेथील डॉ. कुलकर्णी यांनी कृत्रिम श्वास देण्याची नळी टाकून सर्पदंश लस सुरू केली. त्यानंतर मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा देशमुख यांच्याशी संपर्क साधून त्यांना हा प्रकार सांगण्यात आला. तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून पियूषला मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणून अतिदक्षता विभागात उपचार सुरू झाले. या बाळाला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्यात आला. डॉक्टरांनी चार तास शर्थीचे प्रयत्न करून दीड वर्षाच्या बाळाचे प्राण वाचविले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली.
सर्पदंश झालेल्या चिमुरड्याला वाचवले
By admin | Updated: June 18, 2015 22:41 IST