शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जीव वाचविणा:यावरच काळाचा घाला

By admin | Updated: November 1, 2014 00:01 IST

इमारतीमधील इतर रहिवाशांना बाहेर काढणा:या संदीप मोहितेला या दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागला आहे.

पुणो : न:हे येथे इमारत कोसळून झालेल्या अपघातावेळी रात्री तीनच्या सुमारास इमारत कोसाळताना स्वत:च्या जिवाची पर्वा न करता, इमारतीमधील इतर रहिवाशांना बाहेर काढणा:या संदीप मोहितेला या दुर्घटनेत आपला जीव गमवावा लागला आहे. या इमारतीच्या पार्किगमध्ये ढिगा:याखाली अडकलेल्या संदीपचा मृतदेह सायंकाळी पाचच्या सुमारास एनडीआरएफला ढिगा:याखालून काढला. 
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीत सहाव्या मजल्यावर मूळचे साता:याचे असलेले  दिलीप मोहिते यांचे कुटुंब भाडय़ाने राहत होते. राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झालेले दिलीप मोहिते हे पत्नी आणि मुलगा संदीपसह राहत होते. याच इमारतीत त्यांची मुलगी आणि जावईही राहत होते. ज्या घरात मोहिते कुटुंब राहत होते, तेच घर विकत घेण्याची तयारी त्यांनी केली होती.
कराड येथे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेला संदीप हा मार्केट यार्ड येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास इमारतीला तडे जाऊन आवाज सुरू झाला. या वेळी संदीपने आपल्या आई-वडिलांसह बहिणीलाही घराबाहेर काढले. 
या वेळी इमारत खचू लागल्याने अनेक घरांचे दरवाजे त्याखाली दबू लागले होते. त्यांत अनेक कुटुंबे होती. त्यांना दरवाजा अडकल्याने बाहेर पडता येत नव्हते. या वेळी संदीपने या घरांचे दरवाजे तोडून या कुटुंबीयांना बाहेर काढण्यासाठी, तसेच त्यांना बाहेर पडण्यासाठी मदत केली. मात्र, इमारतीमधील सर्व रहिवासी बाहेर आल्यानंतर आपली दुचाकी पार्किग बाहेर काढून आणली. त्यानंतर पुन्हा संदीप आपली नवी चारचाकी पार्किगमधून बाहेर काढण्यासाठी गेला. या वेळी काळाने त्याचा घात केला.
ही माहिती घटनास्थळी दाखल झालेल्या एनडीआरएफच्या पथकाला रहिवाशांनी तत्काळ दिली. त्या वेळी पार्किगच्या बाजूचे ढिगारे उपसण्याचे काम एनडीआरएफ कडून तातडीने हाती घेण्यात आले. मात्र, संदीपर्पयत पोहोचण्यासाठी पथकाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले.  (प्रतिनिधी)