शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सासवडला घनकचऱ्यापासून होणार वीजनिर्मिती

By admin | Updated: November 25, 2015 00:57 IST

घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाला सासवड नगरपालिकेने मान्यता दिली. भारत सरकारचा उपक्रम, जर्मन तंत्रज्ञान आणि वनराई संस्थेचे मार्गदर्शन यातून हा प्रकल्प उभा राहणार आहे.

सासवड : घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाला सासवड नगरपालिकेने मान्यता दिली. भारत सरकारचा उपक्रम, जर्मन तंत्रज्ञान आणि वनराई संस्थेचे मार्गदर्शन यातून हा प्रकल्प उभा राहणार आहे. जर्मन शास्त्रज्ञ, तसेच वनराईचे अधिकारी व नगरपालिका पदाधिकारी यांच्यामध्ये मंगळवारी नगरपालिका सभागृहात चर्चा झाली. त्यामध्ये हा प्रकल्प उभा करण्याबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी होकार दर्शविला. घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पास कमी जागा लागणार असून, त्यापासून कोणतेही प्रदूषण होणार नाही, अशी माहिती वनराईचे रवींद्र मेहेंदळे यांनी दिली. अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, जर्मनीमध्ये असे अनेक प्रकल्प सुरू असून, भारतामध्ये नगरपालिका क्षेत्रात सासवड येथे देशातील पहिला पथदर्शी प्रकल्प उभा राहू शकतो. यासाठी वार्षिक ५ हजार टन कचऱ्याची आवश्यकता असते. याठिकाणी ओला व सुका कचरा वेगळा करण्याची आवश्यकता नसते, तसेच माती, सिमेंटचे, दवाखान्याचा कचरा यांचेही विघटन होते, तसेच इंधनाचा खर्चही फार येत नाही. एक वर्षाच्या कालावधीत ३४० दिवस प्रकल्प सुरू राहतो. यावेळी प्रकल्पाची अधिक माहिती देताना एस. एम. काळे यांनी सांगितले की, हा प्रकल्प ७० कोटी रुपयांचा असून सर्व खर्च संबंधित कंपनी करणार आहे. नगरपालिकेने जागा, रस्ते, वीज आणि पाणी अशा पायाभूत सोयी द्यायच्या आहेत. याप्रसंगी जर्मन शास्त्रज्ञ वोल्फर्ग्यांड फुलर, कार्यकारी अधिकारी मिस्टर हेल्मट, अभियंता मिस्टर इंगो, समन्वयक जर्नल सिंग यांसह माजी आमदार चंदुकाका जगताप, नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, उपनगराध्यक्ष सुहास लांडगे, मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, नगरसेविका वसुधा आनंदे, नगरसेवक प्रमोद जगताप, अजित जगताप, संदीप जगताप, मनोहर जगताप, डॉ राजेश दळवी, योगेश गिरमे, यशवंत भांडवलकर, सचिन भोंडे, माजी उपनगराध्यक्ष यशवंत जगताप, सुरेश रणपिसे यांसह विभागप्रमुख प्रमिला सरवदे, ज्ञानेश्वर गिरमे, मोहन चव्हाण, संजय पवार, प्रवीण जगताप, रंजना दुगार्डे, अभियंता प्रभाकर करपे, अमृता देशमुख, रामानंद कळसकर उपस्थित होते. (वार्ताहर)