शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

मतदारांना साड्या अन् तीर्थयात्रा!

By admin | Updated: December 29, 2016 03:13 IST

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जाहीर होण्याआधीच खेड तालुक्यात वारेमाप उधळपट्टी सुरू झाली आहे. काही मतदारसंघांत इच्छुकांनी खुलेआम साडीवाटप

राजगुरुनगर : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जाहीर होण्याआधीच खेड तालुक्यात वारेमाप उधळपट्टी सुरू झाली आहे. काही मतदारसंघांत इच्छुकांनी खुलेआम साडीवाटप सुरू केले आहे. तसेच मतदारांना सहली घडवून आणण्यात येत आहेत. मंडळांना देणग्या देण्यात येत आहेत आणि सोशल मीडियावर ‘पोस्ट’चा सुकाळ झाला आहे. काहींनी जेवणावळीही सुरू केल्या आहेत. आगामी निवडणुका जवळ आल्या असल्या, तरी अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, इच्छुकांमध्ये आधीपासूनच रस्सीखेच सुरू झाली आहे. काहींना पक्षश्रेष्ठींनी तिकिटासाठी हिरवा कंदील दाखविला असल्याने, तर काहींचे तिकीट नक्की नसतानाही त्यांनी फ्लेक्सबाजी, सोशल मीडियावर मेसेजेसचा तडाखा लावला आहे. कोणाच्याही वाढदिवसाचे अथवा निवड-नियुक्तीचे निमित्त शोधून स्वत:ची प्रसिद्धी करून घेतली जात आहे. काहींनी तर निमित्त नसतानाही स्वत:ची पोस्टर झळकावली आहेत. मतदारांना तीर्थयात्रांना धाडले जात आहे. सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावून मंडळांना, संस्थांना देणग्या दिल्या जात आहेत. सगळ्यात कहर म्हणजे महिलांना सर्रास साडीवाटप सुरू केले आहे. या साड्यांचा दर्जाही फारसा चांगला नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे. मात्र, कोणी आपणहून साड्या दिल्या तर नाकारायच्या कशा, असा प्रश्न महिला मतदारांपुढे आहे. काहींनी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करायला सुरुवात केली आहे. येनकेन प्रकारेण मतदारांना आमिषे दाखवून आपल्याकडे वळविण्याचा आटापिटा सुरू झाला आहे.प्रत्यक्ष निवडणुकीत खर्चाला मयार्दा असल्याने आधीच मतदारांना खूश करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. खर्च करणारे बहुतेक धनदांडगे असल्याने शासनाकडून मात्र याकडे डोळेझाक होत आहे. आजपर्यंत तरी काही कारवाई झाल्याची माहिती नाही. काही जण सरळ पक्षाचे चिन्ह वापरीत असल्याने अधिकारी याची दखल घेणार का, याची आता उत्कंठा आहे. नोटाबंदी असतानाही खर्च करीत असलेल्या उमेदवारांवर छापे मारून चौकशी करावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. मात्र, गावोगावच्या युवक मतदारांकडून याबद्दल नापसंती व्यक्त केली जात आहे. अप्रत्यक्षपणे मतदारांना विकत घेण्याचाच हा प्रकार असल्याचे त्यांचे म्हणणे असून, या प्रवृत्तींना या वेळी धडा शिकविण्याचा त्यांचा मनोदय आहे. तशा प्रकारच्या पोस्ट ते सोशल मीडियावर टाकीत आहेत. आज पैसे खर्च करणारे उद्या हे पैसे वसूल करण्यासाठीच वेळ घालवतील आणि विकासकामे तशीच राहतील, असा एक मतप्रवाह नवमतदारांमध्ये आहे. याउलट, अनेक मतदार सध्या सर्वांकडून भेटी घ्यायच्या; निवडणुकीत मत कोणाला द्यायचे ते पाहू, असा विचार करीत आहेत. इच्छुकांच्या पैशाला ऊत आला असेल, तर आम्ही का मागे राहायचे, असा त्यांचा सवाल आहे. गेल्या वर्षी झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी सर्वांचे पैसे घेतले होते. शेवटी सर्वच पैसे वाटणारे काही निवडून आले नाहीत. याचबरोबर, डावपेचांनाही सुरुवात झाली आहे. आपल्यालाच तिकीट आहे म्हणून खर्च चालू केला आहे, असे भासविले जात आहे. खर्च केल्याचा आभास निर्माण करायचा आणि प्रत्यक्षात फारसा खर्च करायचा नाही, अशी काहींची आयडिया आहे. समोरच्या उमेदवाराला भीती घालण्यासाठी करोडो रुपये खर्च करण्याच्या बाता मारल्या जात आहेत. तर, पैशावर मतदार विकत घेऊन निवडणूक जिंकणार, अशी घमेंडीची भाषा काहीजण बोलत आहेत. खरे तर ते आतून टरकले आहेत; पण खोटा आव आणून आपणच निवडून येणार असल्याची शेखी मिरवीत आहेत. काहीजण पुढच्याचा आताच खर्च व्हावा आणि निवडणुकीत तो मागे पडावा म्हणून सावध पावले उचलत आहेत. (वार्ताहर)- सर्व पक्षांचे श्रेष्ठी तिकीट कुणाला द्यायचे, या विचारात गढले आहेत. आपल्याशी भविष्यात स्पर्धा करणारा उमेदवार नको, असा त्यांचा मानस आहे. एखादे ‘सीट’ गेलेले परवडले; पण भविष्यात डोकेदुखी नको, अशी त्यांची भूमिका आहे, तर काही श्रेष्ठी येनकेन प्रकारेण भावी डोकेदुखीचे पत्ते आताच्या तिकीटवाटपातच कापायचे, त्यासाठी आरपारची लढाई लढावी लागली तरी चालेल, अशा पावित्र्यात आहेत. - काही साधे कार्यकर्ते असलेले इच्छुक उमेदवार परिचयपत्रक घेऊन घरोघर फिरत आहेत. आपल्याकडे पैसे नाहीत; मात्र गुणवत्ता आहे, तळमळ आहे, स्वच्छ चारित्र्य आहे. मतदारांनी धनदांडग्यांचे पैसे घेऊन त्यांचा माज जिरवावा; मात्र हाडाच्या कार्यकर्त्यालाच निवडून द्यावे, अशी भूमिका ते मांडत आहेत.