शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सासवडला उद्यापासून दोन दिवसाआड पाणी

By admin | Updated: May 31, 2017 01:55 IST

शहराला सध्या वीर धरण पाणी योजनेतून पाणीपुरवठा होत आहे, परंतु आता जलाशयात केवळ ४०० एमसीएफटी मृत पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : शहराला सध्या वीर धरण पाणी योजनेतून पाणीपुरवठा होत आहे, परंतु आता जलाशयात केवळ ४०० एमसीएफटी मृत पाणीसाठा शिल्लक राहिला असून सासवडला पाणीपुरवठा करणाऱ्या येथील योजनेची चारी उघडी पडली आहे. त्यामुळे १५ एचपीच्या दोन मोटार जुन्या धरणात टाकून जॅकवेलपर्यंत पाणी घेतले जात आहे. यामुळे पाणी कमी प्रमाणात उचलण्यात येत असल्याने सासवडला १ जूनपासून दोन दिवसांआड मात्र चांगल्या दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मार्तंड भोंडे व उपनगराध्यक्ष विजय वढणे यांनी दिली. सासवडकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी असणाऱ्या वीर धरण पाणीपुरवठा योजनेची व वीर धरणातील पाणीसाठ्याची समक्ष पाहणी नगराध्यक्ष भोंडे यांनी केली. या वेळी उपनगराध्यक्ष विजय वढणे, नगरसेवक दिनेश भिंताडे व पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर गिरमे उपस्थित होते. ७ टीएमसी क्षमता असणाऱ्या वीर धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांतून मोठ्या प्रमाणात आवर्तन सोडण्यात आल्याने पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या या ठिकाणी ४०० एमसीएफटीएवढा मृत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. सासवडला दररोज ५० ते ६० लाख लिटर पाण्याची गरज असून सध्या वीरमधून ४० लाख आणि घोरपडी पाझर तलावातून १० लाख लिटर पाणी घेण्यात येत आहे. गराडे पाझर तलावातील पाणी यापूर्वीच संपले आहे. गतवर्षी या दिवसांत वीरमध्ये पुरेसा पाणीसाठा होता, तसेच सासवडच्या योजनेची चारी उघडी पडली नव्हती, त्यामुळे पाणीटंचाई जाणवली नाही. आता मात्र पाणीसाठा मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिकेने घेतल्याची माहिती नगराध्यक्ष मार्तंड भोंडे आणि उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा समितीचे सभापती विजय वढणे यांनी दिली. त्यातही सध्या वादळी वारे किंवा अन्य कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास अडचण येण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. २००३-०४ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष चंदूकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली साधारण ३५ किमी लांबीची, सुमारे २० कोटी रुपये खर्चाची ही योजना केवळ ९० दिवसांत पूर्ण करण्यात आली होती. लिम्का बुकमध्ये याची नोंद झाली आहे. वीर योजनेची जॅकवेल ही १५ फूट रुंद असून तिची उंची २५ फूट आहे. त्या वेळी असणाऱ्या पंपामधून आजही पाणीउपसा केला जात आहे, या पंपांची पाणीउपसा करण्याची क्षमता आता कमी झाली आहे. त्यामुळे हे पंप पुढील काळात बदलण्यात येणार असून या ठिकाणी सौरऊर्जेचा वापर करून पंप चालविले जाणार आहेत. सध्या वीर योजनेवर जास्त अवलंबून राहावे लागत असल्याने नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहनही नगराध्यक्ष भोंडे व उपनगरध्यक्ष वढणे यांनी केले आहे.