लोणी काळभोर : पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने जबरी चोरी करून फरार झालेल्या सराईत गुन्हेगाराला आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथे सापळा रचून जेरबंद केले आहे. अंकुश ज्ञानेश्वर भोंडवे (वय ३२, रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. २८ फेब्रुवारी रोजी महेश वामनराव पवार (रा. गाडीतळ, हडपसर) हे लोणचे, जॅम, पापड आदींची विक्री करून परतत असताना म्हातोबा माध्यमिक विद्यालयांशेजारी अंकुश भोंडवे याने त्यांना अडवले व त्यांच्या खिशातील ३ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम घेऊन तो फरार झाला होता. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सापळा रचून त्याला जेरबंद केले. भोंडवेवर लोणी काळभोर, यवत, जेजुरी पोलीस ठाण्यात २५ च्यावर जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. (वार्ताहर)
सराईत गुन्हेगाराला अटक
By admin | Updated: March 13, 2015 06:25 IST