शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

सर्जा-राजाचे आळंदीत भव्य स्वागत

By admin | Updated: June 17, 2016 05:04 IST

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जनक हभप हैबतबाबा यांनी सुरू केलेल्या वैभवी पालखी सोहळ्याचे पायी वारीतील श्रींच्या वैभवी रथास यंदा जुंपण्याचा मान मिळालेल्या सर्जा-राजा या

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे जनक हभप हैबतबाबा यांनी सुरू केलेल्या वैभवी पालखी सोहळ्याचे पायी वारीतील श्रींच्या वैभवी रथास यंदा जुंपण्याचा मान मिळालेल्या सर्जा-राजा या बैलजोडीच गुरुवारी आळंदीत ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत, भंडाऱ्याची मुक्तउधळण करीत व हरिनामाच्या गजरात भव्य मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले.हा मान येथील संतोष दगडू वहिले पाटील यांना मिळाला आहे. वहिले यांनी रथवैभवात वाढ करेल अशी सर्जा-राजा या बैलजोडीची निवड करून सुमारे १ लाख ५१ हजार रुपये देऊन रांजणगाव येथील प्रगतिशील शेतकरी पाचुंदकर यांच्याकडून बैल खरेदी केले. या बैलजोडीची आळंदीतील चाकण चौकातून नगरप्रदक्षिणा मार्गे, चावडी चौक, नगर परिषद चौकमार्गे महाद्वार अशी भव्य सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. बैलजोडी मंदिरासमोर दाखल होताच सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर पवार यांनी त्याचे स्वागत केले. आळंदी देवस्थानच्या वतीने प्रमुख विश्वस्त अजित कुलकर्णी यांनी बैलजोडीची पूजा केली. सुवासिनींनी बैलजोडीच औक्षण करत पूजा केली. देवस्थानतर्फे बैलजोडीच्या सेवेचे मानकरी संतोष वहिले यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. आळंदीतील नागरिक, भाविक यांनी बैलजोडी पाहण्यास मिरवणुकीदरम्यान प्रदक्षिणा मार्गावर आणि माऊली मंदिर प्रांगणात मोठी गर्दी केली होती.या वेळी महाद्वारात श्रींच्या पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, आमदार सुरेश गोरे, आळंदीचे नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, शिवसेना जिल्हाप्रमुख राम गावडे, सभापती डी.डी. भोसले, देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अजित कुलकर्णी, विश्वस्त अभय टिळक, जिल्हा परिषद सदस्य किरण मांजरे, आळंदी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, माजी नगराध्यक्ष दत्तात्रय कुऱ्हाडे, बबनराव कुऱ्हाडे, बैलजोडीचे मालक संतोष वहिले, रमेश गोगावले, राजेंद्र घुंडरे, प्रकाश कुऱ्हाडे, उमेश रानवडे, पृथ्वीराज बावीकर, विलास कुऱ्हाडे, शरद मुर्डे, ज्ञानेश्वर कोद्रे, आळंदी पालिकेचे आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक, बैल निवड समितीचे सदस्य, संस्थान कर्मचारी-पदाधिकारी, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)