सुवर्णा नवले, पिंपरीसंभाजीनगर, चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यानात साप व नागांचे संवर्धन केले जाते. घरात अथवा परिसरात सस्तन प्राणी आढळल्यास शहरभरातून नागरिकांचे शेकडो फोन सर्पोद्यानात येत असतात. शहरात १५० सर्पमित्र आहेत. वर्षाला शेकडो सापांचा जीव हे मित्र वाचवत असतात. तसेच, सापडलेले साप वन विभागाच्या माध्यमातून जंगलात सोडले जातात.सर्पोद्यानातील वातावरण झालेले बदल, पाण्यातील बदल, प्राण्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने विशेष काळजी, प्राण्यांना विविध खाद्यपदार्थ पुरविणे आदी प्रकारची कामे सर्पोद्यानात वेळोवेळी करावी लागतात. यासाठी दैनंदिन दिनक्रम ठरलेला आहे. यामुळे दिवसभर प्राण्यांच्या सहवासात राहून हे प्राणिमित्र प्राण्यांसाठी झटत असतात. सर्पोद्यानात मगर, साप, नाग, धामण, घोणस, तस्कर, मण्यार, चापडा, गवत्या, अजगर, धूळ नागीण, डुलक्या घोणस, मांडुळ आदी प्रकारचे सस्तन प्राणी आहेत, याची विशेष काळजी घेतली जाते. सर्पमित्र या प्राण्यांसाठी दिवस व रात्र कोठून फोन येईल, त्या भागात जात असतात. सर्वांत प्रथम उद्यानात कर्मचारी आल्यानंतर प्राणिसंग्रहालयाचे पूर्ण सर्वेक्षण करावे लागते. यानंतर रात्रभरात कोणी जखमी प्राणी आल्यास त्यावर औषधोपचार केला जातो. काहींना पाण्यातून औषधे पुरविली जातात, तर प्राण्यांची विशेष साफसफाई केली जाते. पाण्याची व खाद्याची भांडी साफ करून ठेवली जातात. प्राण्यांचे पिंजरे साफ केले जातात. उद्यानात दाखल झालेल्या प्राण्यांचे अहवाल रोज वन खात्यापर्यंत द्यावे लागतात. नागरिकांच्या माहितीसाठी उद्यानातही ठिकठिकाणी विषारी व बिनविषारी प्राण्यांचे माहितीफलक लावले आहेत. त्या प्राण्याची जात कुठली आहे, प्राण्याचे खाद्य कोणते, प्राण्यांचे वास्तव्य कोठे आढळते, विषारी व बिनविषारी साप कोणते, अशा प्रकारचे माहितीफलक लावले आहेत.
सर्पमित्रांमुळे शकडो सापांना मिळतेय जीवदान
By admin | Updated: August 18, 2015 23:45 IST