देलवडी ग्रामस्थ व मयूर शेलार मित्र मंडळ यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस वितरण भीमा पाटस कारखान्याचे संचालक विकास शेलार व राजेंद्र कोंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विकास शेलार म्हणाले की, ग्रामीण भागातील खेळाडू दिवसेंदिवस प्रत्येक खेळांमध्ये पुढे येण्यासाठी त्यांना प्रेरणा व सुविधा देणे गरजेचे आहे. या स्पर्धेमध्ये जय मल्हार क्रिकेट संघ देलवडी, गोलमाल क्रिकेट संघ देलवडी, सिद्धेश्वर क्रिकेट क्लब पिंपळगाव, संतराज क्रिकेट संघ वाळकी या संघांनी सहभाग घेतला. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून गणेश शेलार तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून शुभम शेळके यांना गौरवण्यात स्पर्धेचे उद्घाटन बापूराव शेलार,महेश शेलार, दीपक देसाई, गणपत लवटे, कृष्णाजी वाघोले, डी. आर. शेलार, नितीन शेलार, शंकर शेलार, मोहन शेलार, परशुराम शेलार, राजाराम शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.
क्रिकेट स्पर्धेत संतराज संघ विजेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:15 IST