शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

भोंदूगिरी करणार्‍या संतोष पिंजणचा पोलिस कस्टडीत आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: April 22, 2017 21:00 IST

पोलीसाच्या कस्टडीत असलेला संतोष पिंजण यांने गुरुवारी मध्यरात्री पोलीस कस्टडीत असताना टाँवेलने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 22 -  लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या घराच्या बाहेर तिरडीचा उतारा व मृत्युयंत्र ठेवल्याच्या आरोपाखाली पोलीसाच्या कस्टडीत असलेला संतोष पिंजण यांने गुरुवारी मध्यरात्री पोलीस कस्टडीत असताना टाँवेलने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र गार्डाच्या कर्मचार्‍याच्या सतर्कतेमुळे ही दुघर्टना ठळली. 
याप्रकारणी शुक्रवारी दि. 21 रोजी वडगाव पोलीस ठाण्यात पिंजण याच्यावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कस्टडीतील चौकशीत भांगरवाडी येथिल मंगेश शेलार या व्यक्तीने मला वरील कृत्य करायला लावले असल्याचे पिंजण याने सांगितल्याने लोणावळ शहर पोलीसांनी शेलारला अटक केली असून आज त्याला वडगाव न्यायालयाने तिन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.तर पिंजणला आज जामिन झाला.
 
दरम्यान पिंजण व शेलार यांच्यात मागील काही वर्षापासून वाद असून ते एकमेकाशी बोलत देखिल नाही. यामुळे जाणिवपुर्वक पिंजण याने शेलार याचे नाव या प्रकरणात गोवले असून खर्‍या मुख्य आरोपीला बगल देण्य‍ाचा हा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप याप्रकरणातील फिर्यादी नगराध्यक्षा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी करत पोलीसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
 
एकंदरितच जादुटोणा व भोंदूगिरीच्या या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली असून मुख्य आरोपी तसेच पिंजण याने नगरसेवक व फिर्यादी यांच्यासमोर दिलेल्या कबुली जबाबातील सफेद रंगाची गाडी व रिव्हाल्वरोल पोलीसांनी तात्काळ जप्त न केल्यास येत्या दोन दिवसात लोणावळा बंद करत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.