वासुंदे - जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ््यातील डोळ््यांचे पारणे फेडणारे मेंढ्यांचे पहिले रिंगण गुरुवार (दि. १२) सायंकाळी दौंड तालुक्याच्या सीमेवर वासुंदे हद्दीत पार पडले. यावेळी पालखी सोहळ््यातील वारकऱ्यांबरोबरच पालखी सोहळ््याचे दर्शन घेण्यासाठी जमलेल्या भाविक भक्तांनी हे मेंढ्याचे रिंगण पाहण्यासाठी अलोट गर्दी केली होती.एरवी आपण सर्वचजण व्यवहारामध्ये अथवा दैनंदिन कामकाजाबाबात बोलत असताना बकºया या शब्दाचा वेगवेगळ््या अर्थाने उदाहरणे अथवा दाखले देण्यासाठी वापर करत असतो. मात्र याठिकाणी होणारे संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावरील पहिले मेंढ्यांचे रिंगण जर आपण डोळ््याने अनुभवले तर मात्र वेगळीच अनुभुती आल्याशिवाय राहत नाही.कारण या ठिकाणी लाळगेवाडी (जिरेगाव) या ठिकाणचे अनेक धनगर बांधव आपल्या मेंढ्याचे कळप घेऊन दाखल असतात. या सर्व मेंढ्या तुकोबारायांच्या पालखी रथास अतिशय शिस्तबद्धरित्या तीन प्रदक्षिणा घालतात.या प्रदक्षिणा घालत असतानाची मेंढ्यांची शिस्त पाहून उपस्थित भक्तगण हे आश्चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाहीत. आणि म्हणूनच गेली चार पाच वर्षांपासून होत असलेल्या या ठिकाणच्या पहिल्या मेंढ्यांच्या रिंगणाचा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी संपूर्ण दौंड तालुक्यासह बारामती तालुक्यातील भक्तगण तसेच पालखी सोहळ््यातील वारकरी बांधव अलोट गर्दी करतात. त्याचबरोबर प्रशासनातीलसर्व विभागांचे अधिकारी, पदाधिकारी व पालखी सोहळ््यातील प्रमुख मेंढ्यांचे रिंगण यशस्वी होण्यासाठी सहकार्य करतात.
दौंडच्या सीमेवर मेंढ्यांचे पहिले रिंगण, संत तुकाराममहाराज पालखी सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 1:30 AM