शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृतने कॅलिफोर्नियात मला घर मिळवून दिले

By admin | Updated: January 9, 2017 03:33 IST

आता येतोय, नूमविचा माजी विद्यार्थी नासातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. आझम थत्ते, अशी वाक्ये उच्चारताच सगळ्यांच्या नजरा या नावाकडे वळल्या

संस्कृतने कॅलिफोर्नियात मला घर मिळवून दिलेपुणे : आता येतोय, नूमविचा माजी विद्यार्थी नासातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. आझम थत्ते, अशी वाक्ये उच्चारताच सगळ्यांच्या नजरा या नावाकडे वळल्या... छत्तीस वर्षांचा एक गोरागोमटा... गालावर खळी असलेला एक तरुण व्यासपीठावर आला... अमेरिकेत वास्तव्यास असलेला आणि एका ग्रहाचा शोध लावलेला हा शास्त्रज्ञ आपल्या शाळेचा विद्यार्थी आहे, हे कळल्यावर नूमविच्या शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा ऊर अभिमानाने भरून आला.चौदा वर्षे परदेशात राहिल्यामुळे इंग्रजीमधून संवाद साधेल, असे वाटत असताना एका वृत्तपत्रात वाचून मी पत्नीसह आज या मेळाव्याला आलो आहे..., असे सांगत अस्खलित मराठीमध्ये त्याने बोलायला सुरुवात केली आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला... मातृभाषेतले शिक्षण आजही मला भावते... इंग्लिश, फ्रेंच अनेक भाषा शिकलो, या भाषेतले साहित्यही वाचले, पण विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर यांच्या कविता त्यांच्यासारखे साहित्य कुठेच वाचायला मिळाले नाही, असे सांगताच ‘तो आला, त्याने पाहिले आणि जिंकले,’ अशीच सर्वांची भावना झाली... आम्ही नूमविय महामेळाव्याचा तोच खरा ‘हिरो’ ठरला! आझमने ग्रह आणि ताऱ्याचे अंतर शोधण्याची ‘अल्गोरिदम’ संशोधन पद्धती शोधून काढली. ग्रहावर खनिजे, मिथेन आहे ते या अल्गोरिदममधून कळू शकते.

(प्रतिनिधी) ग्रह आणि ताऱ्याचे निरीक्षण करताना त्याने एचडी १८९७३३ या ग्रहाचा शोध लावला. ही त्याची उत्तुंग कामगिरी ऐकून सर्व जण भारावून गेले. कॅलिफोर्नियात भाड्याचे घर मिळविताना आलेला अनुभव त्याने कथन केला, एका अमेरिकन बाईचे भाड्याचे घर पाहायला गेलो, पण ती खूपच आढेवेढे घेत होती. संस्कृत भाषेविषयी तिला विशेष आपुलकी होती. तुला येते का संस्कृत? असे तिने मला विचारले आणि माझ्या डोळ्यासमोर आठवीमध्ये संस्कृतच्या बार्इंनी शिकविलेले सुभाषित आठवले, ते कसे म्हटले याचे प्रात्यक्षिक त्याने दाखविले. हे सुभाषित ऐकून त्या अमेरिकन बाईच्या डोळ्यात पाणी आले आणि तिने घराच्या चाव्या माझ्या हातात दिल्या... संस्कृत भाषेने मला घर मिळवून दिले, असे त्याने अभिमानाने सांगितले.