शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना अनुदान लाटणाऱ्यांवर संक्रांत! तातडीने परत न केल्यास संबंधित बँक खाते गोठविण्यात येणार

By नितीन चौधरी | Updated: September 7, 2022 07:44 IST

पुणे जिल्ह्यात असे ३१३ वारस आढळले आहेत. दोनदा अनुदान घेणाऱ्यांना आता ते परत करावे लागणार आहे.

पुणे : कोरोना मृतांच्या वारसांना राज्य सरकारने ५० हजारांचे सानुग्रह अनुदान द्यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होेते. त्यानुसार राज्यातील सुमारे दोन लाख वारसांचे अर्ज मंजूर झाले असून, तब्बल १ हजारांहून अधिक जणांना हे अनुदान दोनदा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यात असे ३१३ वारस आढळले आहेत. दोनदा अनुदान घेणाऱ्यांना आता ते परत करावे लागणार आहे. तसे न केल्यास संबंधित बँक खाते गोठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

संकेतस्थळावर १.४८ लाख जणांच्या मृत्यूची नाेंद- भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या संकेतस्थळावर राज्यात कोरोनामुळे १.४८ लाख जणांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे. - केंद्राच्या तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कोरोना मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचे ठरले होते. त्यानंतर राज्यात  यासाठी २.६० लाख अर्ज आले. त्यापैकी १.९७ लाख अर्ज मंजूर करण्यात आले. 

अनेक ठिकाणांहून अर्ज -राज्याने आतापर्यंत या अनुदानापोटी ९८२.२१ कोटी रुपये वितरित केले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आता सर्व जिल्हाधिकारी व आयुक्तांना हे अनुदान त्वरित परत करण्याची खात्री करण्यास सांगितले आहे. 

पुण्यात ३१३ अर्जदार -राज्यात अनेकांनी मृत व्यक्ती आपले नातेवाईक दाखवून अनुदान लाटण्याचा प्रयत्न केला आहे. ही संख्या १००३ इतकी आहे. दोनदा अनुदान लाटलेल्यांमध्ये पुणे जिल्ह्यात असे ३१३ अर्जदार आहेत. या सर्व अर्जांची छाननी सुरू आहे. 

ज्यांनी दावे केले होते त्यांचे बँक तपशील आहेत. अशांना वैयक्तिक कळविले आहे. अनुदान परत करण्यास सांगितले आहे. तसे न केल्यास ते वसूल केले जाईल; अन्यथा त्यांचे बँक खाते गोठविण्यात येईल.    - संजय धारूरकर, उपसचिव, मदत व पुनर्वसन विभाग 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस