शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानामुळे दोन रुग्णांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 03:23 IST

४३ वर्षीय महिलेचा बारामती-जेजुरी रस्त्यावर रविवारी अपघात झाला. उपचारासाठी महिलेला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पुणे : ४३ वर्षीय महिलेचा बारामती-जेजुरी रस्त्यावर रविवारी अपघात झाला. उपचारासाठी महिलेला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी रात्री महिलेला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. समुपदेशनानंतर नातेवाईकांनी अवयवदानास सहमती दर्शवली. महिलेचे यकृत, हृदय, डोळे आणि त्वचादान करण्यात आल्याने दोन रुग्णांना जीवदान मिळाले.याबाबत माहिती देताना रुबी हॉल क्लिनिकच्या प्रत्यारोपण समन्वयक डॉ. सुरेखा जोशी म्हणाल्या, ‘रुबी हॉलमधील ५२ वर्षीय महिलेमध्ये यकृताचे प्रत्यारोपण करण्यात आले. नॅशनल आॅर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट आॅर्गनायझेशन बॉडी (नोट्टो) च्या माध्यमातून हृदय दिल्लीतील एम्स रुग्णालयातकडे पाठवण्यात आले. तेथील ४४ वर्षीय महिलेमध्ये हृदय प्रत्यारोपित करण्यात आले.’ दुपारी १.१० मिनिटांनी रुबी हॉलमधून ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून हृदय पाच मिनिटांत पुणे विमानतळावर पोहोचले. रुबी हॉलमधील डॉक्टरांची टीम हृदय घेऊन ३ वाजून २० मिनिटांनी दिल्लीला पोहोचली. दिल्लीतील एम्स रुग्णालयातील ४४ वर्षीय महिलेमध्ये हृदय यशस्वीरित्या प्रत्यारोपित करण्यात आले, अशी माहिती झेडटीसीसीच्या पुणे समन्वयक आरती गोखले यांनी दिली.त्वचा एक वर्षापर्यंत जतन करून ठेवण्यात आली असून, पुढील ७२ तासांमध्ये डोळ्यांचे प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. महिलेच्या शरीरातून हृदय काढण्याची शस्त्रक्रिया डॉ. डिकास साहू आणि डॉ. मनोज सुरेराज यांनी यशस्वीपणे पार पाडली. यकृत प्रत्यारोपणासाठी डॉ. कमलेश बोकील आणि डॉ. मनीष वर्मा यांनी काम पाहिले. पुण्यातून बाहेर अवयव पाठवण्यात आल्याची ही तिसरी वेळ आहे. डिसेंबर महिन्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातून चेन्नईला हृदय पाठवण्यात आले तर, फेब्रुवारीमध्ये रुबी हॉलमधून दिल्लीला हृदय पाठवण्यात आले होते. रुबी हॉल क्लिनिकमधून ७ वेळा हृदय पाठवण्यात आले आहे.