शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

संग्रामदुर्ग किल्ल्यात दिसला बिबट्या

By admin | Updated: November 15, 2016 03:39 IST

येथील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याजवळील पोलीस वसाहतीसमोर नागरिकांना बिबट्या आढळला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाच्या वती

चाकण : येथील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याजवळील पोलीस वसाहतीसमोर नागरिकांना बिबट्या आढळला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.काल दुपारी एक वाजता संग्रामदुर्ग किल्ल्याजवळ पोलीस वसाहतीसमोर काही मुलांना बिबट्यासदृश्य वन्यप्राणी आढळून आल्याने त्या ठिकाणी तरुणांनी गर्दी केली होती. सर्पमित्र प्रफुल्ल गुरव व बाप्पू शेवकरी यांनी वन विभागाला कळविले. नंतर वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले. ज्या मुलांनी बिबट्या पाहिल्याचे सांगितले, त्यांनी काढलेले फोटो वन कर्मचाऱ्यांना दाखवले. मात्र, ते अस्पष्ट होते. वनकर्मचाऱ्यांना आजूबाजूला कचरा व भटकी कुत्री आढळून आली. जवळूनच नाला वाहत आहे व किल्ल्याच्या खंदकात भरपूर झाडोरा आहे. त्यामुळे वन्यप्राण्याला लपायला भरपूर जागा आहे. वनविभागाने पाऊलखुणा शोधल्या. पण, गवत असल्याने त्या आढळल्या नाहीत. वन्यप्राणी आढळल्यास पुढील सूचना वनविभागाने दिल्या आहेत. रात्री वनपरिक्षेत्र अधिकारी साबळे यांच्या सूचनेनुसार नागरिकांनी जनजागृती केली व परिसराची परत पाहाणी केली.