शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

संयमाचा बांध फुटतोय

By admin | Updated: November 14, 2016 07:02 IST

सकाळी आठ वाजल्यापासून पोस्टाच्या दारात उभा आहे, दुपारचे बारा वाजून गेले तरीही पोस्ट आॅफिस उघडले नाही. साहेब! घरी जेवण करायला सुट्टे पैसे नाहीत,

पुणे : सकाळी आठ वाजल्यापासून पोस्टाच्या दारात उभा आहे, दुपारचे बारा वाजून गेले तरीही पोस्ट आॅफिस उघडले नाही. साहेब! घरी जेवण करायला सुट्टे पैसे नाहीत, आज तरी सुट्टे पैसे द्या ना, भाजीपाला घेण्यासाठी सुट्टे पैसे नाहीत; कसेबसे चार दिवस काढले, पाचवा दिवस उगवला तरीही बँका सुरळीतपणे सुरू नाहीत. कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी फक्त सर्वसामान्यांना रांगा लावाव्या लागत आहेत, आणखी किती दिवस हा त्रास सहन करायचा; आता आमचा संयमाचा बांध फुटू लागला आहे, अशा भावना शहरातील नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. केंद्र शासनाच्या नोटा बंदच्या निर्णयाचा सर्वाधिक त्रास सामान्य नागरिकांना होत असून बँक, पोस्ट आॅफिसच्या दारात तासन्तास उभे राहून सुट्टे पैसे मिळवण्यासाठी पहाटेपासून यावे लागत आहे. नागरिकांकडे सुट्टे पैसे नसल्यामुळे भाजीपाला, दूध खरेदी करण्यापासून साधा वडापाव खाण्यासही अडचणी येत आहेत. शहरातील काही बँका, पोस्ट आॅफिस पाचवा दिवस उगवला तरीही अद्याप सुरळीत सुरू झालेल्या नाहीत. निवडक बँकांचे एटीएम मशिन सुरू झाल्या तरी त्यासमोर लांबचलांब रांगा दिसून आल्या. एटीएममधून एका व्यक्तीला केवळ दोन हजार रुपपांपर्यंत रक्कम काढता येत होते. काही तासांतच ही रक्कम संपत असल्याने नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून आले. नोटा बंदच्या निर्णयामुळे शनिवार, रविवारी बँका सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असला तरी बँकांपर्यंत पैसे न पोहोचल्यामुळे शहरातील अनेक बँका सुरूच झाल्या नाहीत. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील काही बँका उशिरा सुरू झाल्या तर काही बँका पैसे संपल्याने दुपारी ३ वाजताच बंद झाल्या. भांडारकर रस्त्यासह घोले रस्त्यावरील काही बँकांचे एटीएम केंद्र सुरू होते. बाजीराव रस्त्यावरील एटीएम बंद असल्याने नागरिक एटीएम सुरू होण्याची प्रतिक्षा करताना दिसून आले. तासंतास रांगेत उभे राहून हातात १०० रुपयांच्या २० नोटा पडल्याचे पाहून काही नागरिकांच्या चेह-यावर आनंद दिसून येत होता.बँका व पोस्ट आॅफिसमधून पैसे बदलून मिळतील, असे स्पष्ट केले असताना काही नागरिकांना मर्यादित पैसे दिले जात होते.पैसे बदलण्यासाठी आलेल्या नागरिकांना काही बँकांकडून केवळ ५०० रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जात होती. त्यामुळे ही रक्कम संपल्यानंतर पुन्हा एकदा रांगेत उभे रहावे लागणार,या चिंतेने घरी जात होते. (प्रतिनिधी)