कोरोनाबरोबरच आता डेंगूच्या रुग्णात वाढ : शहरात ११७ सक्रीय रुग्ण
डमी ९६१
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सर्दी, खोकला, घसा खवखवणे वगळता, ताप येणे व अंगदुखी ही दोन लक्षणे कोरोना व डेंगू आजारात समान आहेत़ त्यामुळे सध्याच्या कोरोना आपत्तीत सदर लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तातडीने नजीकच्या तपासणी केंद्रावर जाऊन तपासणी करावी असे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे़
आजमितीला शहरात कोरोनाचे दररोज साधाणत: ३०० रूग्ण आढळून येत आहेत़ तर एकट्या जुलै महिन्यात पहिल्या पंधरा दिवसातच तब्बल ८६ डेंगूचे रूग्ण आढळून आले आहेत़ पावसाळ्याचे दिवस असल्याने सध्या घराच्या टेरेसवर, पार्किंगमध्ये, घरातील कुंड्या तथा फ्रि जच्या खालील ट्रेमध्ये तथा पाण्याच्या टाक्यांच्या तळाशी डेंगूचे डास व अंडी यांची मोठी पैदास होताना आढळून येत आहे़ त्यामुळे साचलेले पाणी बदलणे, औषध फवारणी करणे जरूरी बनले आहे़
अंगदुखी, ताप येणे ही लक्षणे दोन्ही आजारात समान असली तरी, डेंगूची व कोरोनाच्या चाचण्या वेगळ्या आहेत़ यामुळे कोरोनाची अॅण्टीजेन अथवा आरटीपीसीआर चाचणी केल्यावरही, ताप अंगदुखी कायम असल्यास रक्ततपासणी ही डेंगूचे निदान करण्याकरिता आवश्यक बनली आहे़
जानेवारी, २०२१ पासून २२ जुलैपर्यंत पुणे महापालिका हद्दीत ११७ डेंगूचे रूग्ण आढळून आले आहेत़ जानेवारी महिन्यात २२ डेंगूचे रूग्ण आढळून आले होते़ ही संख्या पुढे फे ब्रुवारी, मार्च, एपिल मध्ये हा आकडा अनुक्रमे ६,२ व १ वर आला़ तर मे जूनमध्ये एकही डेंगूचा रूग्ण शहरात आढळून आला नाही़ पण जुलै महिन्यात ८६ रूग्ण वाढल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे़ शहरातील पंधरा हिवताप निरिक्षक (एमएसआय) यांच्या टिमला आप-आपल्या भागातील सोसायट्या, पार्किंग स्पेस, टेरेस, मोकळ्या जागा, झोपडपट्टी परिसरातील घरे याठिकाणी जनजागृती करण्याबरोबरच डेंगूच्या डासाच्या उत्पत्तीची ठिकाणे औषध फवारणी करून नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती महापालिकेचे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ़संजीव वावरे यांनी दिली आहे़
--------------------
चौकट
डेंग्यूचे रूग्ण
२०१९ :- १ हजार ४०९
२०२० :- १८३
२०२१ ( २२ जुलैपर्यंत) :- ११७
--------------
कोट :-
डेंगू उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करा
शहरात जुलै महिन्यात डेंगूचे रूग्ण मोठ्या संख्येने आढळून आले आहेत़ त्यामुळे नागरिकांनी मोठ्या कालावधीसाठी पाणी साठवूण ठेऊ नये़ तसेच घराच्या टेरेसवर, पार्किंगमध्ये, घरातील कुंड्या तथा फ्रि जच्या खालील ट्रेमध्ये तथा पाण्याच्या टाक्यां वारंवार स्वच्छ कराव्यात़
ज्या भागात डेंगूचे डास आढळून आले आहेत तेथे लागलीच औषध फवारणीचे आदेश सर्व एमएसआय यांना देण्यात आले असून, वारंवार सूचना देऊनही पाणी साचून ठेवणाºया संस्था अथवा घरांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़ आत्तापर्यंत शहरात डेंगू डास उत्पत्तीस कारणीभूत असलेल्या ठिकाणांना जबाबदार असलेल्यांकडून ४७ हजार रूपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे़
डॉ. संजीव वावरे
साथरोग नियंत्रण अधिकारी, पुणे महापालिका.