शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

वढू बुद्रुकला रंगला संभाजीराजांचा राज्याभिषेक सोहळा

By admin | Updated: January 18, 2016 01:12 IST

श्री छत्रपती संभाजीमहाराज समाधिस्थळ श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे जय शिवराय संघटना, छावा ग्रुप, वढू बुद्रुक ग्रामस्थ तसेच शंभुराजे राज्याभिषेक सोहळा समिती

कोरेगाव भीमा : श्री छत्रपती संभाजीमहाराज समाधिस्थळ श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे जय शिवराय संघटना, छावा ग्रुप, वढू बुद्रुक ग्रामस्थ तसेच शंभुराजे राज्याभिषेक सोहळा समिती यांच्या विद्यमाने छत्रपती संभाजीमहाराजांचा ३३५ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.संभाजीराजांच्या ३३५व्या राज्याभिषेक दिनानिमित्त श्रीक्षेत्र तुळापूर येथे संभाजीराजांच्या मूर्तीला अभिषेक करून मिरवणूक काढून पालखी नगर रस्त्याने वढू बुद्रुक येथे आणण्यात आली. त्यानंतर वढू येथे समाधिपूजन, तसेच राज्याभिषेक सोहळाही पार पडला. या वेळी आमदार बाबूराव पाचर्णे, संत तुकाराममहाराजांचे वंशज व संत तुकाराममहाराज संस्थानचे विश्वस्त हभप शांताराममहाराज मोरे, अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे सदस्य सुरेश मुळावकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान शेळके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, बाळासाहेब खैरे, श्रीकांत ढमढेरे, बाळासाहेब चव्हाण, प्रफुल्ल शिवले, अंकुश शिवले, संतोष शिवले, उत्तमराव भोंडवे पाटील, चंद्रकांत वारघडे, अंकुश घार आदी सहभागी झाले होते. या वेळी पाचर्णे म्हणाले , श्रीक्षेत्र वढू बुद्रुकची आदर्श ग्राम योजनेमध्ये निवड करण्यात आली आहे. तसेच बढूला ‘ब’ वर्गाच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी मोठा निधी तत्काळ मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. शंभू छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा लवकरच राज्यभर साजरा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोरेमहाराज यांनीही या कार्यक्रमाची व्याप्ती दरवर्षी वाढत असल्याचे सांगून आयोजकांचे कौतुक केले.या वेळी शिवव्याख्याते गणेश फरताळे यांनी छत्रपती संभाजीराजांच्या चरित्रावर मार्गदर्शन करून सूत्रसंचालन केले. जय शिवराय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अमित सातव व मच्छिंद्र गायकवाड यांनी स्वागत केले. गणेश जाधव यांनी आभार मानले. (वार्ताहर)