शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणाला आलेला शिळेपणा संभाजीराजे घालवू शकतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “मराठा आरक्षणाचा प्रश्न राजसत्तेशिवाय सुटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे. खासदार संभाजीराजेंनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “मराठा आरक्षणाचा प्रश्न राजसत्तेशिवाय सुटणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या शिळेपणा आला आहे. खासदार संभाजीराजेंनी पुढाकार घेतला तर त्यास ताजेपणा येईल,” असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना ॲड. आंबेडकर म्हणाले, “पवारांचे राजकारण चाळीस वर्षे पाहतोय. ते नेहमी ‘नरो वा कुंजरो’ भूमिका घेतात. इतर प्रश्नांवर ठीक आहे. पण मराठा आरक्षणावर ते नजीकच्या काळात स्पष्ट भूमिका घेतील अशी अपेक्षा करुया.” खासदार संभाजीराजे यांनी शनिवारी (दि. २९) अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यानंतर अ‍ॅड. आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खासदार छत्रपती संभाजीराजे यावेळी उपस्थित होते.

ॲड. आंबेडकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा आरक्षणासह सर्वच आरक्षणाचे मुद्दे राज्यकर्त्यांसाठी त्रासदायक ठरणार आहेत. येणार्‍या सरकारला काही वेळ राजसत्ता चालवायला अडचणीचे ठरेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मराठा आरक्षणात समस्या निर्माण झाली आहे. त्यावर राज्यपाल अथवा राष्ट्रपतींमार्फत पुनर्विचार याचिका हाच सध्या कायदेशीर मार्ग आहे.

“आरक्षण हा समाजाला व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा मार्ग आहे. त्याचबरोबर प्रशासन आरक्षण हे ‘अ‍ॅडमिनिस्ट्रेशन प्रिन्सिपल’ होत आहे. पण इथले राज्यकर्ते ते मानायला तयार नाहीत,” असे ॲड. आंबेडकर यांनी सांगितले. मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढे न्यायचा तर त्यासाठी राजसत्तेची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणावरील चर्चेत संसदेत सांगितले की, “आरक्षण ही एक खिडकी आहे. ती आम्ही खुली केली आहे.” सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ही खिडकी बंद झाली असल्याचे ॲड. आंबेडकर म्हणाले. त्यावर उपाय म्हणून राज्यपाल अथवा राष्ट्रपतींमार्फत पुनर्विचार याचिका दाखल करता येईल. ती फेटाळली तरी पुन्हा दुसरी याचिका दाखल करता येऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

चौकटआंबेडकर-संभाजीराजे एकत्र

“राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र होते. तर संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र का येऊ शकत नाहीत ? शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांचा समतेचा वारसा आम्हाला मिळाला आहे. समाजातील जातीय विषमता कमी करण्यासाठी बहुजन समाज एका छत्राखाली कसा आणता येईल, याविषयी आमची चर्चा झाली. मराठा आरक्षणावर त्यांनी आम्हाला दोन-तीन मार्ग सांगितले,” असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.