परीटवाडी येथील नंदकरी वस्तीजवळ सुमारे साडे चार ते पाच वर्षांचे मादी जातीचे सांबर चुकून मानवी वस्तीत आले. या परिसरात असलेल्या कुत्र्यांनी या सांबराचा पाठलाग केल्याने हे सांबर घाबरून सैरावैरा पळू लागले. कुत्र्यांपासून जीव वाचविण्याच्या धडपडीत येथील जिल्हा परिषद शाळेच्या लोखंडी गेटला धडक बसल्याने या सांबराचा जागीच मृत्यू झाला. परीटवाडी येथील ग्रामस्थ राहुल विधाटे यांनी याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. वनपरिमंडल अधिकारी मनीषा काळे व वनरक्षक कल्याणी पोटवडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी भेट देऊन मृत सांबराला ताब्यात घेऊन शवविच्छेदनानंतर त्याची विल्हेवाट लावली. पशुधन विकास अधिकारी डॉ. शशिकांत डुंबरे व डॉ.निखिल बनगर यांनी शवविच्छेदन केले.
जीव वाचविण्याच्या प्रयत्नात सांबराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:15 IST