पुणो : विविध क्षेत्रत महिला अग्रेसर आहेत. त्यांच्या कर्तृत्वाने जगालाही त्यांनी अंचबित केले आहे. उल्लेखनीय कार्य करणा:या महिलांना सन्मान करण्यासाठी ‘लोकमत सखी सन्मान-2क्14’ हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. जीवाचे रान करून घर आणि दार सांभाळणा:या महिलांच्या कष्ट उपसण्याची जिद्दीला, चिकाटीला आणि कर्तबगारीला सलाम करण्यासाठी लोकमतच्यावतीने हा पुरस्कार बहाल करण्यात येतो.
निष्ठेने आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता काम करणा:या महिलांचे कार्य उजेडात येऊन जास्तीत जास्ती उत्तम कार्याचा गौरव व्हावा यासाठी या सन्मानीय पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहे. पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे.
‘लोकमत’च्यावतीने आयोजित ‘लोकमत वुमन समिट’ हा महिलांचा गौरव करणारा व महिलांविषयक विविध बाबींवर प्रकाश झोत टाकणारा आगळा वेगळा कार्यक्रम आहे. मागील तीनही वर्षी देशातील राजकारणापासून ते समाजकारणातील मान्यवर महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. या समिटमध्ये कर्तबगार महिलांना ‘लोकमत सखी सन्मान’ देऊन गौरविण्यात येते. आज विविध क्षेत्रत महिला आपला ठसा उमटवत आहेत त्यांचा सन्मान हा ‘लोकमत’चा गौरव आहे. त्यामुळे या पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.
या पुरस्कारासाठी पुणो जिल्ह्यातील विविध क्षेत्रतील महिलांना सहभागी होता येणार आहे. क्रीडा, सामाजिक, शौर्य, शिक्षण, उद्योग व व्यापार, कला आणि साहित्य, आरोग्य या क्षेत्रत वैशिष्टयपुर्ण व उल्लेखनीय कार्य करणा:या महिलांकडून प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. या पुरस्कारासाठी प्रवेशिका 17 नोव्हेंबरपर्यत लोकमत कार्यालयात पाठवायच्या आहेत. प्रवेशिकेसोबत संबंधित क्षेत्रतील कार्याची व वैयक्तिक माहिती व पासपोर्ट आकाराचा फोटो अवश्य पाठवा. प्रवेशिका पाठविण्याचा पत्ता : पुणो शहर कार्यालय - व्हीया वेन्टेज, 1/2 मजला, सीटीएस 55/2, एरंडवणो, लॉ कॉलेज रोड, फिल्म इन्स्टिटय़ूटजवळ, पुणो 411क्क्4 , फोन (क्2क्) 66848586, ¨पपरी- चिंचवड कार्यालय - लोकमत पिंपरी- चिंचवड कार्यालय, विशाल ई- स्क्वेअर आवार, पिंपरी -18, फोन (क्2क्) 67345678.