तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी, गावडेवाडी, मेंगडेवाडी, निरगुडसर, पारगावसह बहुतांशी गावांत ४ ते ५ नाभिक कुटुंबे आहेत. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सलून व्यवसायासाठी गाळे भाड्याने घेऊन काम करत आहेत. परंतु सलून व्यवसायामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एक वर्षापासून सलून व ब्युटी पार्लर व्यवसाय बंद असल्यामुळे घरखर्च, दुकान भाडे, कर्जाचे हप्ते, लाईट बिल कसे भरायचे यासारख्या असंख्य आर्थिक प्रश्नांना नाभिक समाजाला सामोरे जाताना अनेक अडचणी येत आहे. त्यामुळे राज्यशासनाने सलून दुकाने चालू करण्याची परवानगी द्यावी किंवा कुटुंबाला किमान दरमहा दहा हजार रुपये मदत करावी, अशी मागणी सलून व्यावसायिक शिवलिंग गायकवाड यांनी केली आहे.
इतर व्यावसायिकांप्रमाणे सलून व्यावसायिकांनाही परवानगी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:09 IST