शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माहितीपुस्तकांची ७०% विक्री

By admin | Updated: June 3, 2015 04:35 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रकिया सोमवारपासून सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील या प्रक्रियेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.

पिंपरी : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रकिया सोमवारपासून सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यातील या प्रक्रियेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. आॅनलाइन नोंदी करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी व पालकांची झुंबड उडाली आहे. याबाबतच्या मार्गदर्शन वर्गास पालक व विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. दुसऱ्या दिवशीपर्यंत चिंचवड- निगडी आणि पिंपरी-भोसरी या दोन विभागांतून एकूण ७० टक्के माहितीपुस्तकांची विक्री झाली. दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन प्रवेश प्रकिया सोमवारी सुरू झाली. पहिल्या टप्प्यातील नोंदणीस दुसऱ्या दिवशीपर्यंत ७० टक्केपर्यंत माहितीपुस्तकांची विक्री झाली. पहिल्या टप्प्यात अर्ज नोंदणीची मुदत ५ जूनपर्यंत आहे. आॅनलाइन माहिती कशी भरावी आणि काय काळजी घ्यावी, याबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. आपआपल्या शाळा किंवा मार्गदर्शन केंद्रावरून माहितीपुस्तिका खरेदी केली जात आहे. त्यांची किंमत १०० रुपये आहे. अर्ज भरण्यापूर्वी माहितीपुस्तिका काळजीपूर्वक वाचावी. पुस्तिकेमध्ये लॉग-इन आयडी आणि पासवर्ड दिलेला आहे. शाळेत जाऊन या संदर्भातील प्रक्रिया समजावून घ्यावी. संगणकावर दिलेल्या सूचना पाळून टप्प्याटप्प्याने आॅनलाइन अर्ज भरावा. ‘कन्फर्म’ या बटनावर क्लिक करून अर्ज निश्चित करावा. माहितीमध्ये काही त्रुटी किंवा दुरुस्ती करावयाची असेल, तर ती कागदपत्रे शाळेकडून प्रमाणित करून घ्यावीत. सवलतीसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे शाळेकडून प्रमाणित करून घ्यावीत, अशी माहिती मार्गदर्शन वर्गात करण्यात आली. थेट स्क्रिनवर माहिती भरण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. पिंपरीतील जयहिंद कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य कैलास सोनवणे, आर. जी. भोसले आणि आकुर्डीतील म्हाळसाकांत कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य आर. पी. पोळ, के. एम. विश्वासराव यांनी मार्गदर्शन केले. पालक व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. निकालानंतर दुसऱ्या टप्प्यात कनिष्ठ महाविद्यालयाचा पसंतीक्रम अर्ज भरावयाचा आहे. तसेच, गेल्या वर्षीचा महाविद्यालयाचे कटआॅफ गुण, मिळालेले गुण, शाखा, शुल्क, माध्यम, वैकल्पिक विषय, निवासापासूनचे अंतर, जाण्या-येण्याची सोय आदींचा विचार करून महाविद्यालयाचा पसंतीक्रम ठरवायचा आहे. निश्चित केलेल्या पसंतीक्रमाचा प्राधान्यक्रम ठरवून कॉलेज कोड अर्जात भरावयाचा आहे. अर्ज भरताना उपलब्ध ५० पर्यायांपैकी किमान ४० पर्याय नोंदवावे लागतील.(प्रतिनिधी)