शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नसरापूरला २ हजार क्विंटल तांदळाची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2016 03:17 IST

महाराष्ट्रात सुवासिक तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या नसरापूर येथील तांदूळ बाजारात या वर्षीच्या हंगामात आत्तापर्यंत झालेल्या बाजारातून दोन हजार क्विंटल तांदळाची विक्री

नसरापूर : महाराष्ट्रात सुवासिक तांदळासाठी प्रसिद्ध असलेल्या नसरापूर येथील तांदूळ बाजारात या वर्षीच्या हंगामात आत्तापर्यंत झालेल्या बाजारातून दोन हजार क्विंटल तांदळाची विक्री झाली. प्रामुख्याने इंद्रायणी जातीच्या सुवासिक तांदळाला मोठी मागणी आहे.नसरापूर येथील तांदूळ बाजारातील तांदळाला प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई व पुण्यातील ग्राहकांनी पसंती दर्शवली आहे. येथील तांदूळ यापूर्वी नसरापूर गावठाणातील तांदूळआळीत भरत असे. बाजारात तांदूळ विक्रीसाठी आणताना बैलगाडीचा वापर होत होता. नसरापूर बाजारपेठेत येणारा तांदूळ प्रामुख्याने भोर तालुक्यातील तांभाड, हातवे, सोंडे, मोहरी, दीडघर, जांभळी; तर वेल्ह्यातील वांगणी खोऱ्यातील कोळवडी, मांगदरी, कातवडी, वांगणी, करंजावणे, मार्गासनी, वाजेघर, दामगुडास्नी, वेल्हा आदी गावातील तांदूळ ग्राहकांच्या पसंतीस उतरतो. तांदूळआळीतील तांदूळ बाजारात यापूर्वी वरंगळ, आंबेमोहर, रत्नागिरी २४ आदी जातींचे तांदूळ शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणत. त्या वेळी आंबेमोहर तांदळाला विशेष मागणी होती. बाजारात जिकडे पाहावे तिकडे तांदळाच्या पोत्यांच्या थप्प्याच थप्प्या दिसत. यात्रेच्या हंगामातच खरी तांदळाची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. पूर्वीच्या आंबेमोहर तांदळाची जागा आता सुवासिक व तुपट वासाच्या तांदळाने घेतली आहे. इंद्रायणी तांदळाच्या खालोखाल आता ग्राहक रत्नागिरी तांदळाला विशेष पसंती देतात. साधारणपणे इंद्रायणी तांदळापेक्षा या तांदळाचा भावही ७ ते ८ रुपयांनी कमी असतो. (वार्ताहर)१९९० नंतर येथील तांदूळ बाजारपेठेचे स्थलांतर होऊन भोर बाजार समितीच्या उपबाजार जागेत तांदूळ बाजारात विक्रीला प्रारंभ करण्यात आला. या वर्षी ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला व मागणी असलेला इंद्रायणी तांदूळ साधारणपणे ३५ ते ३८ रुपये किलो दराने विकला जात असून, रत्नागीरी तांदळाची ३० ते ३२ रुपयांनी विक्री होत आहे. अत्यल्प उत्पादन होत असलेल्या आंबेमोहर तांदळाची विक्री होत आहे.व्यापारी व ग्राहक तांदूळखरेदीसाठी बाजारात आल्याने चोखंदळपणे प्रतीनुसार तांदळाची खरेदी करता येते; याउलट आता शेतकरी आपला तांदूळ ग्राहकांना घरपोच पोहोचवू लागला आहे. बाजारातील विक्रीबरोबरच तांदळाच्या मिलवरही विक्री केली जाते. भोर व वेल्हे या तालुक्यांतील यात्रांचा हंगाम सुरू झाला, की येथील शेतकरी तांदूळ त्वरित विक्रीस आणतो. भोर व वेल्हे या तालुक्यांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नसरापूर तांदूळबाजारात तांदूळखरेदीसाठी मोठी गर्दी होते आहे.