शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गैरहजर शिक्षकाला वेतन

By admin | Updated: October 22, 2016 03:46 IST

लोखंडवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दोन महिन्यांपासून विनाअर्ज गैरहजर असूनही शिक्षण विभागाने त्याचे वेतन अदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बारामती : लोखंडवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दोन महिन्यांपासून विनाअर्ज गैरहजर असूनही शिक्षण विभागाने त्याचे वेतन अदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत गटशिक्षण अधिकारी प्रदीप गुरव यांना विचारणा केली असता, ‘कामाच्या महासागरात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हे लक्षात आले नसेल. पेमेंट काढण्याचे काम मुख्याध्यापकांचे आहे,’ असा अजब तर्क लावला. लोखंडवाडी शाळेतील बाळासाहेब गणपत फडतरे या शिक्षकावर बारामती पंचायत समितीचा शिक्षण विभाग मेहेरबान झाला आहे. कोणतीही पूर्व परवानगी अथवा पत्रव्यवहार न करता गैरहजर असूनही या शिक्षकाला दोन महिन्यांचे वेतन अदा करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना काठीने बेदम मारहाण केल्याने फडतरे व विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर जुलै-आॅगस्ट महिन्यांमध्ये फडतरे हा रजेसाठी अर्ज न करता तब्बल दोन महिने गैरहजर राहिला. शाळेच्या हजेरी पत्रकावर देखील फडतरे याच्या नावासमोर गैरहजरचा शेरा आहे. तसेच वडगाव निंबाळकरच्या केंद्रप्रमुखांनी शाळेला दिलेल्या भेटी दरम्यान बाळासाहेब फडतरे हा गैरहजर असल्याचा शेरा दिला आहे. यानंतर २३ आॅगस्ट २०१६ ला फडतरे याला केवळ तोंडी आदेशाने रूजू करून घेतले. यानंतही फडतरे याला पंचायत समितीमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मेहरबानीमुळे वेतन मिळाले. केंद्रप्रमुखांनी व मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाला फडतरे गैरहजर असल्याचे कळवले होते, तरी देखील पेमेंट कसे झाले, असे गटशिक्षण अधिकाऱ्यांना विचारले असता, ‘त्यांनी कळवले होते. मला ते मान्य आहे. मात्र कामाच्या महासागरात आमच्या ते लक्षात राहतेच असे नाही. सध्या आॅनलाईन पेमेंट होते. त्याचे पेमेंट केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांनी कसे काय ‘फॉरवर्ड’ केले. मुख्याध्यापकच पेमेंट करतात’ असे त्यांनी सांगितले. या प्रकाराबाबत शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबाबतच संशय व्यक्त होऊ लागल्याचे शिक्षकांमधून बोलले जात आहे. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांनी केली सारवासारव याबाबत गटशिक्षण अधिकारी प्रदीप गुरव यांच्याशी संपर्क साधला असता, ‘आम्ही संबंधीत व्यक्तीवर कारवाई कराणार आहोत. त्याचे पेमेंट जमा करून घेणार आहोत. याबाबतचे परिपत्रक काढले आहे’, अशी सारवासारव केली.