शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चेतन भगतसमवेत रंगणार सखींच्या गप्पा

By admin | Updated: October 6, 2016 03:56 IST

प्रख्यात लेखक चेतन भगत यांच्यासमवेत सखी मंचच्या सदस्यांना गप्पांची संधी मिळणार आहे. लोकमततर्फे आयोजित या कार्यक्रमाचे

पुणे : प्रख्यात लेखक चेतन भगत यांच्यासमवेत सखी मंचच्या सदस्यांना गप्पांची संधी मिळणार आहे. लोकमततर्फे आयोजित या कार्यक्रमाचे केसरी टूर्स व ट्रॅव्हल्स प्रा.लि.च्या सहयोगाने व औदी हेसह प्रायोजक लग्झरी पार्टनर आहेत. सहज, साध्या, सोप्या मांडणीतून थेट हृदयाला हात घालणारे लेखन करणारे प्रख्यात लेखक चेतन भगत गुरुवारी (दि. ६) सखींसमवेत दिलखुलास गप्पांमध्ये रंगणार आहेत. लोकमत सखी प्रिव्हीलेज क्लबच्या माध्यमातून या वैशिष्ट्यपूर्ण अशा संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल वेस्ट इन येथे दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. व्यावसायिक, औद्योगिक क्षेत्रामध्ये कर्तृत्व प्रस्थापित केलेल्या नामवंत २०० महिला या वेळी उपस्थित राहणार आहेत. ‘सिस्टरहूड अनफोल्डेड’ या विषयावर चेतन भगत महिलांशी संवाद साधतील, तसेच त्यांच्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरेही देतील. चेतन भगत हे केवळ लेखक नसून एक स्टाईल आयकॉन आहेत. आघाडीचा व नव्या पिढीचा लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. स्तंभलेखक, प्रेरणादायी वक्ते म्हणूनही ते सुपरिचित आहेत. फाईव्ह पॉर्इंट समवन, वन नाईट अ‍ॅट कॉलसेंटर, ३ मिस्टेक्स आॅफ माय लाईफ, मेकिंग इंडिया आॅसम, हाफ गर्लफ्रेंड ही त्यांची काही गाजलेली पुस्तके आहेत. त्यांच्या पुस्तकांवर बॉलिवूडमध्ये थ्री इडियट्स, काय पो छे, टू स्टेटस असे गाजलेले चित्रपटही बनलेले आहेत. (प्रतिनिधी)४या दिलखुलास चर्चेच्या माध्यमातून स्त्रियांविषयीचे त्यांचे विचार आणि नव्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेले अंतरंग उलगडले जाणार आहेत. हा कार्यक्रम केसरी टूर्सने प्रायोजित केलेला असून लक्झरी पार्टनर आॅडी आहेत. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठी असून निमंत्रण पत्रिका असणाऱ्यांनाच या ठिकाणी प्रवेश देण्यात येईल.