शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

संत सोपानकाकाभक्ती, पुरंदरभूषण पुरस्कार जाहीर

By admin | Updated: June 10, 2017 01:56 IST

येथील संत सोपानकाका सहकारी बँकेच्या वतीने पुरंदरच्या मातीशी नाते असलेल्या व सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून उल्लेखनीय

लोकमत न्यूज नेटवर्कसासवड : येथील संत सोपानकाका सहकारी बँकेच्या वतीने पुरंदरच्या मातीशी नाते असलेल्या व सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना व व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. या वर्षीचे पुरस्कार बँकेचे अध्यक्ष संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. सासवड येथील ‘वाघिरे महाविद्यालया’स पुरंदरभूषणपुरस्कार जाहीर झाला असून ‘लेप्रसी’ संस्था येवलेवाडी यांना ‘संत सोपानकाकाभक्ती’ पुरस्काराने गौरविले आहे.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने सन १९७२ मध्ये सासवड येथे विनाअनुदान तत्त्वावर हे महाविद्यालय सुरू केले. त्यांना अनेकांनी मदतीचा हातभार लावला. आज या महाविद्यालयात पाच हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान, संगणक या विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. तालुक्याच्या शैक्षणिक व वैचारिक जडणघडणीत महाविद्यालयाचा महत्त्वाचा वाटा आहे. या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार दिला आहे. पुरंदरभूषण पुरस्कारासाठी २१ हजार रुपये रोख, सोपानकाकाभक्ती पुरस्कारासाठी १५ हजार रुपये रोख, उर्वरित पुरस्कारासाठी प्रत्येकी ७ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवारी (दि. ११) सकाळी ११ वाजता सासवड येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात डॉ. विश्वनाथ कराड यांच्या हस्ते व माजी आमदार चंदूकाका जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण होणार आहे, अशी माहिती निवड समितीचे अध्यक्ष प्रा. नारायण टाक यांनी दिली. या वेळी निवड समिती सदस्य कुंडलिक मेमाणे, अनिल गद्रे, चंद्रकांत टिळेकर, संदीप जगताप, दत्तानाना भोंगळे, गणेश मुळीक, रवींद्रपंत जगताप उपस्थित होते.